तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीवर करा 'हे' उपाय, सर्वांसमोर लाजण्याची वेळ येणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 01:41 PM2021-10-03T13:41:52+5:302021-10-03T13:45:02+5:30

काही व्यक्तींच्या तोंडाला नेहमीच दुर्गंधी येते. अगदी ब्रश केल्यानंतरही त्याच्या तोंडातून वास येत राहतो.अशा परिस्थितीत काही टिप्स वापरुनआपण तोंडाची दुर्गंधी दूर करू शकतो .चला तर मग काय आहेत त्या टिप्स जाणून घेऊ या.

tips for get rid of bad breath, how to prevent smelly mouth | तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीवर करा 'हे' उपाय, सर्वांसमोर लाजण्याची वेळ येणार नाही...

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीवर करा 'हे' उपाय, सर्वांसमोर लाजण्याची वेळ येणार नाही...

Next

सकाळी उठल्यावर आपण ब्रश करत नाही तेव्हा तोंडाला दुर्गंधी येते. ब्रश न केल्यास तोंडाची दुर्गंधी येणे सामान्य बाब आहे, परंतु काही व्यक्तींच्या तोंडाला नेहमीच दुर्गंधी येते. अगदी ब्रश केल्यानंतरही त्याच्या तोंडातून वास येत राहतो.अशा परिस्थितीत काही टिप्स वापरुनआपण तोंडाची दुर्गंधी दूर करू शकतो .चला तर मग काय आहेत त्या टिप्स जाणून घेऊ या.

  •  ग्रीन टी मध्ये अँटीबेक्टेरियल घटक असतात, जे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.
  • जास्त पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते आणि दुर्गंधी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
  • डाळिंबाची साल पाण्यात उकळून या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

  • कोरडे धणे माऊथ फ्रेशनर म्हणून काम करतात. ते चघळल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.
  • तुळशीची पाने खाल्ल्याने तोंडाचा वास दूर होतो.
  • पुदिन्याच्या पानांचा वापर तोंडाचा दुर्गंधी दूर करण्यास मदत करतो.
  • मोहरीच्या तेलात दररोज एक चिमूटभर मीठ मिसळून हिरड्यांना मसाज केल्याने हिरड्या निरोगी राहतात तसेच तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
  • तोंडात लवंग ठेवून चघळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि दातदुखीवरही आराम मिळतो.
  • तोंडात बडीशेप ठेऊन चघळल्याने हे माऊथ फ्रेशनर म्हणून काम करते. यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधी कमी होऊ शकतो.
  • पेरूची पाने चघळल्याने तोंडाचा वास लवकर दूर होतो.
  • पेपरमिंट, ज्येष्ठमध, हिरवी वेलची चावल्यानेही तोंडाचा वास दूर होतो.
     

Web Title: tips for get rid of bad breath, how to prevent smelly mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.