बुटांच्या दुर्गंधीने आहात हैराण? हे घरगुती उपाय करा त्रास टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 03:09 PM2018-04-19T15:09:06+5:302018-04-19T15:09:06+5:30

उन्हाळा असो वा पावसाळा दोन्ही सीझनमध्ये बूट आणि मोज्यांच्या दुर्गंधीमुळे तुमच्यासोबत इतरांनाही त्रास होतो.

Tips to get rid of smelly shoes | बुटांच्या दुर्गंधीने आहात हैराण? हे घरगुती उपाय करा त्रास टाळा

बुटांच्या दुर्गंधीने आहात हैराण? हे घरगुती उपाय करा त्रास टाळा

Next

तुम्हाला अनेकदा बाहेर किंवा घरात तुमच्या बुटांच्या दुर्गंधीमुळे लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला असेल. जर तुम्हाला या त्रासापासून सुटका हवी असेल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही घरुगुती टिप्स आहेत. उन्हाळा असो वा पावसाळा दोन्ही सीझनमध्ये बूट आणि मोज्यांच्या दुर्गंधीमुळे तुमच्यासोबत इतरांनाही त्रास होतो. अशात खालील काही सोपे उपाय करुन तुम्ही या समस्येतून सुटका मिळवू शकता. 

टी बॅग

बुटांची दुर्गंधी घालवण्यासाठी सर्वातआधी टी बॅग काही वेळासाठी उकळत्या पाण्यात टाका. नंतर ती बॅग पाण्यातून काढून थंद होऊ द्या. आता ही टी बॅग काही वेळांसाठी बुटांमध्ये ठेवा. असे केल्याने बुटांची दुर्गंधी दूर होईल. 

बेकिंग सोडा

बुटांची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही थोडा बेकिंग सोडा बुटांमध्ये टाका. यासाठी रोज रात्री तुम्ही बुटात थोडा बेकिंग सोडा टाकून ठेवा आणि सकाळी उठून तो साफ करा. याचा बुटांची दुर्गंधी घालवण्यास फायदा होईल. यासोबतच याने बुटातील बॅक्टेरियाही नष्ट होईल. 

फळांची साल

लिंबू, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांची साल बुटांमध्ये टाकून ठेवल्यास याचा फायदा होतो. त्यासोबतच यामुळे बुटांचा चांगला सुगंधही येईल. तसेच बुटांची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही त्यात दोन थेंब लॅव्हेंडर ऑईलही टाकू शकता. या ऑईलमध्ये अॅंटीबॅक्टेरिअल क्षमता असतात. त्यामुळे बुटांची दुर्गंधी येणे बंद होते.
 

Web Title: Tips to get rid of smelly shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.