राग कंट्रोल करण्याच्या टिप्स, असा करा राग शांत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:36 PM2018-08-15T15:36:05+5:302018-08-15T15:36:21+5:30
राग शांत करण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. जेणेकरु काही अनुचित घडणार नाही आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
राग हा आपला सर्वात मोठा शत्रू असतो हे अनेकदा तुम्ही ऐकलं असेल आणि कदाचित अनुभवलही असेल. रागाच्या भरात काय कुणाच्याही हातून काहीही होऊ शकतं. इतकंच नाही तर रागामुळे आपल्या आरोग्यावरही वाइट परिणाम होतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे हाच चांगला उपाय मानला जातो. राग शांत करण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. जेणेकरु काही अनुचित घडणार नाही आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
वेगवेगळ्या अभ्यासांमधून हे समोर आलंय की, रागाची सुरुवात ही मांसपेशींमध्ये तणाव होण्यापासून होते. राग आल्यावर हात आणि पायांच्या मांसपेशी फडफड करायला लागतात. चेहऱ्यावर ताण यायला लागतो, श्वास भरुन येतो. याने शरीराची ऊर्जा कमी होते.
असे करा रागावर कंट्रोल
1) आकडे मोजा : राग आल्यावर श्वास भरुन येतो. फुफ्फुस आधीपेक्षा अधिक क्रियाशील होतं. पटापट श्वास घेतल्याने शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण अधिक होतं, जे शरीरातील अन्नामुळे अधिक ऊर्जा निर्माण करतं, यकृतामधून अधिक प्रमाणात ग्लायकोजन निघू लागतं. त्यामुळे गरजेचं आहे की, राग आल्यावर हळूहळू श्वास घ्या. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाढे म्हणायला सुरुवात करा.
2) खिडक्या उघडा : थंड हवेची एक झुळूक तुमचा राग शांत करु शकते. त्यामुळे जेव्हाही राग येईल तेव्हा घराच्या खिडक्या उघडा. बाहेरच्या हवेला आत येऊ द्या आणि तुमच्या आतील रागाला बाहेर जाण्यासाठी वाट मोकळी करुन द्या.
3) बाहेर फिरायला जा : हिरव्या गवतावर फिरण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. याने रागही नियंत्रित होतो. जेव्हाही राग येईल तेव्हा चप्पल न घालता थोडावेळ चाला. गवत नसेल तर केवळ फरशीवरही तुम्ही चालू शकता.
4) थंड पाणी प्यावं : थंड पाणी सर्वांनाच आवडतं. हे थंड पाणी राग घालवण्याच्याही कामात येत. जर राग आला असेल तर अशात एक ग्लास थंड पाणी प्यायल्यास राग शांत होईल.