ओल्या हातांमुळे होऊ शकतं व्हायरसचं इन्फेक्शन, हात सुकवण्याची कोणती पध्दत योग्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 03:34 PM2020-04-22T15:34:56+5:302020-04-22T15:43:32+5:30
इन्फेक्शनला रोखण्याासाठी हात स्वच्छ आणि कोरडे करणं गरजेचं असतं. तसं न झाल्यास इन्फेक्शन पसरण्याचा धोका जास्त असतो.
कोरोना व्हायरसच्या महामारीने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना भारतात सुद्धा झपाट्याने पसरत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन करण्याासह सोशल डिस्टेंसिंगचं महत्व पटवून दिलं जात आहे. कोरोनापासून बचाव करण्याासाठी शासनाच्या सूचनांचं पालन करण्यासह वैयक्तीक काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात एक गोष्ट दिसून आली आहे. ती म्हणजे कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी हॅण्ड ड्रायरपेक्षा टिश्यु पेपरने हात पुसणं फायदेशीर ठरेल. इन्फेक्शनला रोखण्याासाठी हात स्वच्छ आणि कोरडे करणं गरजेचं असतं. तसं न झाल्यास इन्फेक्शन पसरण्याचा धोका जास्त असतो. ब्रिटेनमधील लीड्स विद्यापिठाच्या रिसर्चकर्त्यांनी हात सुकवण्याच्या पद्धतीचा व्हायरसवर कसा परिणाम होतो. याबाबत संशोधन केले होते.
रिसर्च करत असाताना चार व्यक्तींच्या हातांवर वायरसचं संक्रमण( जे व्हायरस माणसांसाठी घातक ठरत नाहीत) केले होते. नंतर या चौघांनी हात धुतले नाहीत. त्यांनी हा प्रयोग करत असताना एप्रोन घातले होते. जेणेकरून हात सुकल्यानंतर व्हायरसचं संक्रमण कपड्यांमार्फत कितपत होऊ शकतं हे दिसून येईल. रिर्सचकर्त्यांना या प्रयोगादरम्यान दिसून आलं की ड्रायरने हात सुकवलेल्या लोकांच्या एप्रोनवर संक्रमण जास्त दिसून आलं. तुलनेने टिश्यू पेपरने हात स्वच्छ पुसलेल्या लोकांच्या एप्रोनवर संक्रमणाचं प्रमाण कमी होतं. म्हणून व्हायरसच्या संक्रमणाचा धोका टाळण्याासाठी ड्रायरपेक्षा टिश्यू पेपरचा वापर करून हात पुसावे.
(The bacterial horror of hot-air hand dryers)