तोंडाच्या दुर्गंधीमुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात? 'या' घरगुती उपायांनी मिळेल दुर्गंधीपासून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:29 PM2020-01-23T12:29:26+5:302020-01-23T12:37:56+5:30
कोणत्याही व्यक्तीचा चेहरा आणि बॉडी लॅन्गवेज पाहून इतर लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतात.
कोणत्याही व्यक्तीचा चेहरा आणि बॉडी लॅन्गवेज पाहून इतर लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतात. पण कितीही सुंदर किंवा आकर्षक शरिरयष्टी असली तर हसताना किंवा बोलताना तुमच्या श्वासांचा दुर्गंध येत असेल तर तुमचं इंप्रेशन खराब होऊ शकतं. या समस्येचा सामना जर तुम्हाला सतत करावा लागतं असेल तर ही समस्या खूप त्रासदायक ठरू शकते. त्यासाठी आपल्या तोंडातून येत असलेली दुर्गंधी रोखण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला काही घरुगुती उपाय सांगणार आहोत . ज्यांचा वापर करून तुम्ही श्वासांना येत असेलेला दुर्गंध रोखू शकता.
(image credit- health magazine)
तोंडातून येत असलेला दुर्गंध हा काहीही खाल्यानंतर लगेच चुळ न भरणे, दातांची आणि तोंडाची स्वच्छता न करणे यांमुले सुद्धा येऊ शकतो. तसंच तंबाखूच्या सेवनाने सुद्धा समस्या उद्भवू शकते. तोंट सुकल्यासारखं वाटत असेल तर ओरल इन्फेक्शन होण्याचा सुद्धा धोका असतो. तोंडात असलेले लाळ ही तोंडाला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं. लाळेत असलेले ऐंटीबैक्टीरियल प्रॉपर्टीज दातांच्या रोगांपासून वाचण्यास मदत करतात. कारण त्यामुळे दातांमध्ये अनेक प्रकारचे आजार घर करून असतात.
जर तुम्हाला तुमच्या तोंडातून येत असलेल्या दुर्गर्धीची लाज वाटत असेल तर तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जेवण करण्याच्या १० मिनिट आधी आणि जेवण झाल्यानंतर १० मिनिटांनी पाणी प्यायला विसरू नका. त्यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासोबतच ओरल हेल्थ सुद्धा चांगली राहील.
शुगर फ्रि कॅन्डी
(image credit- farnendermer.com)
तोंडाचा वास येऊ नये म्हणून तुम्ही शुगर फ्रि कॅन्डी किंवा च्विंगम खा. यामुळे तुमच्या दातांचा व्यायाम होण्याबरोबरच तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तसंच त्यामुळे गालांचा आकार व्यवस्थित होतो.
साखर ,मीठ आणि मद्याच्या सेवनावर नियंत्रण
(image credit-medimetry)
जर तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्याची आवड असेल तर या गोष्टीचा तुमच्या दातांवर परिणाम होऊ शकतो. गरजेपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे तुमच्या तोंडाला वास येण्याची शक्यता असते. तसंच मद्याचं अतिेसेवन सुद्धा तोंडाला येत असलेल्या वासाचे कारण ठरू शकतं. त्यासाठी तुम्ही आहारात साखरेचे प्रमाण कमी ठेवा. (हे पण वाचा-थंड की गरम....केस धुण्यासाठी कोणतं पाणी चांगलं असतं?)
दिवसातून दोनवेळा ब्रश करा
श्वासांची दुर्गंधी येऊ नये असं जर तुम्हला वाटत असेल तर सकाली उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी तीनवेळा ब्रश करा. त्यामुळे अनेक तासांपर्यत तुमच्या तोंडातून दुर्गंध येणार नाही. नाष्ता किंवा काहीही खाल्यानंतर चुळ भरा. याशिवाय दुर्गंधीपासून सुटका मिळवायची असल्यास आहारात गाजर आणि ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरेल. तसंच वेळोवेळी दातांची तपासणी करून दातानां कसं चांगलं आणि स्वच्छ ठेवता येईल असा प्रयत्न करा. (हे पण वाचा-वजन कमी करण्यासाठी 'या' तीन डाळी ठरतात परफेक्ट उपाय, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्)