सणांच्या काळात तेलात होत असणारी भेसळ कशी ओळखाल? FSSAI ने उघड केले सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 01:11 PM2021-09-12T13:11:04+5:302021-09-12T13:15:02+5:30

सध्या मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता तेलामध्येही भेसळत होत आहे. तुम्ही घरी आणलेलं तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं? 

tips to know adulteration in oil. FSSAI Food Safety and Standards Authority of India tells how to do it | सणांच्या काळात तेलात होत असणारी भेसळ कशी ओळखाल? FSSAI ने उघड केले सत्य...

सणांच्या काळात तेलात होत असणारी भेसळ कशी ओळखाल? FSSAI ने उघड केले सत्य...

googlenewsNext

सण उत्सवाच्या काळामध्ये तेलाची आवश्यकता खूप जास्त असते. त्यामुळे आपण बऱ्याचदा घाऊक दरात तेल खरेदी करतो. सध्या मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता तेलामध्येही भेसळत होत आहे. तुम्ही घरी आणलेलं तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं? 

सणासुदीच्या काळात तेलात भेसळीच्या तक्रारीही वाढतात. खरं तर, भेसळयुक्त तेलाचा रंग पिवळा करण्यासाठी, त्यात घातक मेटानिल यलो वापरलं जातं. जे आपल्यासाठी खूप घातक असतं. आपल्या घरी आणलेलं तेल भेसऴयुक्त आहे की नाही हे ओळखायचं कसं याची माहिती चक्क FSSAI ने ट्वीटरवरून दिली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने तेलातील भेसळीविरोधात ट्विटरवर Detecting Food Adulterants नावाची मोहीम सुरू केली. भेसळयुक्त तेल जास्त काळ खाणे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. एफएसएसएआय या मोहीमेअंतर्गत लोकांना घरी अन्न भेसळ कशी तपासायची हे सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की FSSAI ने खाद्यतेलातील भेसळ कशी ओळखायची ते सांगितलं आहे.

पहिल्यांदा टेस्टट्यूबमध्ये १ मिली तेलाचा नमुना घ्या
या तेलाच्या नमुन्यामध्ये ४ मिली डिस्टिल्ड वॉटर मिसळा त्यानंतर ही ट्यूब हलवत राहा
या एकत्र केलेल्या मिश्रणाला २ मिली दुसऱ्या टेस्टट्यूबमध्ये घ्या 2l कंसेंट्रेटेड HCL मिसळा
आता तुम्हाला भेसळयुक्त केलेला पदार्थ वर तरंगताना दिलेल
जर तेल भेसळयुक्त नसेल तर तेलावर तरंग येणार नाही
भेसळयुक्त तेलातील वरच्या थराचा रंग बदलला याचा अर्थ तुमच्या तेलात भेसळ आहे

मेटॅनिल यलो हा खाद्य रंग आहे जो भारतात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, मेटॅनिल यलो मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. तो आपल्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम करतो. 

Web Title: tips to know adulteration in oil. FSSAI Food Safety and Standards Authority of India tells how to do it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.