जेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते? 'या' उपायांनी करा कंट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 01:18 PM2020-05-26T13:18:41+5:302020-05-26T13:32:06+5:30

अनेकांना जेवण झाल्यानंतर गॅस पास करण्याची समस्या सगळ्यात जास्त जाणवते. आज आम्ही तुम्हाला गॅस पास होण्याच्या समस्येवर काही उपाय सांगणार आहोत.

Tips that may help you to deal with farting myb | जेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते? 'या' उपायांनी करा कंट्रोल 

जेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते? 'या' उपायांनी करा कंट्रोल 

Next

गॅस पास करण्याची समस्या ही खूप कॉमन असली तरी एकामर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर ही समस्या खूपच त्रासदायक वाटू शकते. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकजण घरी बसून आहेत. प्रमाणापेक्षा जास्त खाणं, अर्जीर्ण होणं, मेदयुक्त तसंच मैद्याचे पदार्थ खाल्यामुळे पोटाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अनेकांना जेवण झाल्यानंतर गॅस पास होण्याची समस्या सगळ्यात जास्त जाणवते. आज आम्ही तुम्हाला गॅस पास होण्याच्या समस्येवर काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकता.

सावकाश खा

तुम्हाला कल्पना नसेल तर पण शरीरातील जास्तीत जास्त गॅस हा हवेमुळे तयार होत असतो. अन्न सावकाश चावून तुम्ही ही समस्या कमी करू शकता. घाईघाईत जेवण करून नका. बोलताना, एखादं काम करताना खाऊ नका कारण त्यामुळे गॅस तयार होतो. 

च्युइंगम चावू नका

काही लोकांना दिवसभर च्युइंगम चावण्याची सवय असते. त्यामुळे चावत असताना जास्तीत जास्त हवा तोंडावाटे आत घेतली जाते. पण  ही गोष्ट गॅस पास होण्यासाठी  गोष्ट  कारणीभूत ठरू शकते. म्हणून तर तुमच्या तोंडाचा वास येत असेल तर माऊथ वॉशचा वापर करा.

गॅस तयार करत असलेल्या खाद्यपदार्थाचे सेवन कमी करा

काही पदार्थांमध्ये कार्बोहाइड्रेट, फ्रुक्टोज, लॅक्टोज असतात.  इतर पदार्थांच्या तुलनेत गॅस तयार करत असलेले घटक या पदार्थामध्ये जास्त असतात.  त्याासाठी साबुदाणे, स्प्राऊट्स, ब्रोकोली, कांदा, सोडा, कार्बोनेड सोडा, गहू, बटाटा या पदार्थांचे सेवन कमी करा

कोल्डड्रिंक्सचं सेवन

शीतपेयांमध्ये दबावाखाली वायू भरलेले असतात, तसंच त्यात असलेल्या सोड्यामुळेदेखील फसफसण्याची क्रिया होऊन गॅस निघत असतो. त्यामुळे शीतपेयं प्यायल्यावर गॅस होतो. याशिवाय पाणी कमी प्यायल्यामुळे अपचन होऊन किंवा जेवणानंतर प्रमाणापेक्षा जास्त पाणी घेतल्याने पोट फुगून पोटात गॅस तयार होतो.

शारीरिक हालचाली वाढवा

जर तुम्हाला आपली पचनक्रिया व्यवस्थित ठेवायची असेल तर शारिरीक हालचाली वाढवायला हव्यात. कारण शरीराची पुरेशी हालचाल न झाल्यामुळे  पोट बिघडून गॅस पास होण्याची समस्या वाढते. 

मादक पदार्थांचे सेवन करू नका

सिगारेट, ई-सिगारेट या पदार्थाचे सेवन शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. त्यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवते. परिणामी गॅस होण्याची समस्या उद्भवते.   

चीनी वैज्ञानिकांचा दावा; कोरोना तर काहीच नव्हे 'हा' अज्ञात व्हायरस करु शकतो हल्ला

घरातील बेडशीटसुद्धा ठरू शकते इन्फेक्शन पसरण्याचं मोठं कारणं; जाणून घ्या वापराची योग्य पद्धत

Web Title: Tips that may help you to deal with farting myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.