कामात बिझी असल्याने दिवसभर पाणी पिणं विरसता, या टिप्स फॉलो करून वाढवा इनटेक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 09:57 AM2024-03-18T09:57:29+5:302024-03-18T09:58:02+5:30
Water Drinking Tips : अनेक लोक कामाच्या नादात शरीरासाठी आवश्यक पाणी पिणं विसरतात. त्यामुळे आम्ही काही अशा टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पाण्याचं इनटेक वाढवू शकता.
Water Drinking Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. खासकरून उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं. पण तरीही जास्तीत जास्त लोक दिवसभर भरपूर पाणी पित नाहीत. पाणी आपलं शरीर हायड्रेट ठेवण्यासोबत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतं. दुसरी बाब अशीही आहे की, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिल्यानेही शरीराला नुकसान पोहोचू शकतं.
प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी 2 लीटर पाणी प्यायला हवं. असं केलं तर शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो. अनेक लोक कामाच्या नादात शरीरासाठी आवश्यक पाणी पिणं विसरतात. त्यामुळे आम्ही काही अशा टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पाण्याचं इनटेक वाढवू शकता.
पाण्याची बॉटल सोबत ठेवा
कधीही घराबाहेर पडाल किंवा ऑफिसला जात असाल किंवा कुणाला भेटायला जाणार असाल तर आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेवा. अनेकदा काही कामाने तुम्ही दिवसभर घराबाहेर असता अशात पाणी पिण्याचं विसरता. अशात बॉटल जवळ असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी पित राहू शकता.
फोनमध्ये अलार्म सेट करा
पाणी पिणं विसरत असाल तर हे लक्षात ठेवा की, सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे फोनमध्ये अलार्म सेट करा. तुम्हाला अनेक अॅपही मिळतील जे खासकरून याच कामासाठी बनवले आहेत. प्रत्येक अलार्मवर एक कप पाणी पिण्याची सवय लावा. अनेकदा हे त्रासदायक ठरू शकतं, पण याचे परिणाम चांगले आहेत.
इंफ्यूज वॉटर (फ्लेवर्ड वॉटर)
पाणी पिण्याचा काही लोकांना कंटाळा येतो. अशात पाण्यात काही फळं, भाज्या किंवा हर्ब्सचा वापर करून इंफ्यूज वॉटर तयार करू शकता. याने टेस्टही वेगळी लागते आणि आरोग्याला फायदेही होतात. लिंबू, पदीना, काकडी किंवा तुळशीचं कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. काही लोक वेगवेगल्या बेरीजचा वापर करतात.
सवय लावा
काही झालं तरी सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यानंतर दिवसभर जे काही खाल त्याच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्या. हळूहळू याची सवय लावा.
पाणी असलेल्या फळांचं सेवन
शरीराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेगळाही मार्ग निवडू शकता. यासाठी अशा गोष्टींचं सेवन करा ज्यात भरपूर पाणी असतं. जसे की, कलिंगड, संत्री, स्ट्रॉबेरी, काकडी इत्यादी. या फळांमुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. सोबतच शरीराला फायबर आणि अनेक पोषक तत्व मिळतात.