Tips to Reduce Belly Fat: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बदला या सवयी, नाही तर कधीच कमी होणार नाही पोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 12:18 PM2022-02-05T12:18:16+5:302022-02-05T12:33:40+5:30
Tips to Reduce Belly Fat: लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी लोक योगापासून ते डाएट प्लान तयार करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही वेट लॉस टिप्स तुमचं वजन कमी करण्याऐवजी वाढवू शकतात.
Tips to Reduce Belly Fat: आजकालच्या बिझी लाइफस्टाईलमध्ये असंतुलित आहार घेणे किंव जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने वजन वाढणं (Weight Loss Tips) ही एक सामान्य समस्या बनली आहे. हेच कारण आहे की आज प्रत्येक दुसरी व्यक्ती लठ्ठपणामुळे चिंतेत असते. लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी लोक योगापासून ते डाएट प्लान तयार करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही वेट लॉस टिप्स तुमचं वजन कमी करण्याऐवजी वाढवू शकतात.
अनेकदा लठ्ठपणा कमी करण्याच्या नादात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ज्या कारणाने बॉडीत फॅटचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे बेली फॅट म्हणजे पोटा बाहेर येऊ लागतं. पण जर तुम्ही खरंच वजन कमी करून फिट आणि हेल्दी रहायचं असेल तर काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. thehealthsite या वेबसाईटमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, खालील टिप्स फॉलो केल्यातर तुमचं वजनही कमी होईल आणि लठ्ठपणा येणार नाही.
असंतुलित आहार घेणं टाळा
काही लोक वजन कमी करण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट प्लान फॉलो करतात. तर काही लोक लवकर फिट होण्यासाठी झिरो कार्बन आणि झिरो फॅट असणाऱ्या पदार्थांचं सेवन करू लागतात. पण वेट लूज करण्याची ही पद्धत तुमच्यासाठी घातक ठरू शकते.
असं केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ लागते. ज्यात मसल्स लॉस आणि शरीरात पाण्याची कमतरता अशा प्रकारच्या समस्या होऊ लागतात. त्यामुळे फार गरजेचं आहे की पोषक तत्वांनी भरपूर संतुलित आहार आपल्या डाएटचा भाग बनवा. सोबतच आपल्या कॅलरी इंटेकवर खास लक्ष द्या.
भरपूर पाणी पिणं गरजेचं
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर पाण्याला आपल्या डाएटचा महत्वाचा भाग बनवायला विसरू नका. पाणी तुमचा लठ्ठपणा कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतो. दर थोड्या वेळाने पाणी पित राहिल्याने पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्ही हाय कॅलरी असलेल्या पदार्थांचं सेवन कमी करता. तसेच शरीरात मेटाबॉलिज्मही रेटही वाढतं. ज्यामुळे तुमचं वजन कमी होऊ लागतं.
पुरेशी झोप घेणं विसरू नका
अनेकदा झोप पूर्ण न झाल्याने किंवा रात्री उशीरापर्यंत जागी राहिल्याने बॉडीमध्ये कॉर्टिसोल नावाचं हार्मोन्स वाढू लागतं. ज्यामुळे तुम्हाला तणाव येऊ लागतो आणि याचा थेट परिणाम तुमच्या वजनासोबतच तुमच्या आरोग्यावरही होतो. रात्री उशीरापर्यंत जागे राहिल्याने हाय कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा वाढू लागते. जे शरीरातील मेटाबॉलिज्म रेटला प्रभावित करतात. आणि तुमचं वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं.