युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यास या ५ गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:46 AM2018-10-18T09:46:51+5:302018-10-18T09:59:33+5:30
यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच लघवीच्या मार्गात होणारं संक्रमण. हे इन्फेक्शन झाल्यास तुम्हाला गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो.
यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच लघवीच्या मार्गात होणारं संक्रमण. हे इन्फेक्शन झाल्यास तुम्हाला गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. हे इन्फेक्शन झाल्यास लघवी करताना वेदना होऊ शकतात. बॅक्टेरियामुळे यूरीनरी ट्रॅक्टमध्ये सूज येऊ शकतो आणि लघवी करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे खालीलप्रमाणे सांगता येईल.
भरपूर पाणी प्यावे -
पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असल्याने शरीराची पाण्याची गरज अधिक वाढते. कमी पाणी प्यायल्याने ब्लॅडरमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने या इन्फेक्शनपासून आराम मिळू शकतो.
लघवी रोखून ठेवू नका -
लघवी न करणे किंवा रोखून ठेवल्याने यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. कारण जेव्हा तुम्ही लघवी रोखून ठेवता तेव्हा ब्लॅडरमधून बॅक्टेरिया बाहेर येऊ शकत नाही. याने आजार होण्याची शक्यता अधिक असते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक संबंध
यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले असताना शारीरिक संबंध न ठेवणे योग्य ठरेल. कारण असे केल्यास इन्फेक्शन महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्स मार्गे ब्लॅडरपर्यंत पोहोचू शकतं आणि एका वेगळ्याच आजाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे इन्फेक्शन दूर होण्याची वाट बघा.
औषधे पूर्ण घ्यावी
असंही होऊ शकतं की, अॅंटीबायोटिक्सच्या दोन डोसनंतरही तुम्हाला आराम मिळू शकतो. पण म्हणजे अशात औषधे मध्येच बंद करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे जितक्या दिवसांचं औषध डॉक्टरांनी दिलंय ते पूर्ण घ्यावं.
आपल्या मनाने औषधे घेऊ नका
जर तुम्ही या यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्येवर स्वत:च्या मनाने उपचार घ्याल तर समस्या अधिक वाढू शकते. इन्फेक्शन आणखी पसरू शकतं. तसेच यावर उपचार घेण्यास उशीर केला तर अक्यूट किडनी इन्फेक्शनही होऊ शकतं.