वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून थकलात? मग हे करून पाहाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:47 PM2021-05-20T16:47:35+5:302021-05-20T17:12:16+5:30

अनेक उपाय करुन जर वजन कमी होत नसेल, तर ही हेल्दी ड्रिंकची रेसिपी नक्की ट्राय करा.

Tired of many remedies for weight loss? Then try this ... | वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून थकलात? मग हे करून पाहाच...

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून थकलात? मग हे करून पाहाच...

Next

वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करत असाल. हे उपाय किती परिणामकारक ठरतात हा तर खरा प्रश्न आहे. अनेक उपाय करुन जर वजन कमी होत नसेल, तर डाएटिशियन स्वाती बथवाल यांनी ओन्ली माय हेल्थला सांगितलेली ही हेल्दी ड्रिंकची रेसिपी नक्की ट्राय करा. यात लसूण, आलं, काळी मिरीची पावडर, हळद तुळशीची पान, लिंबाचा रस असे पदार्थ आहेत. यात मुख्य घटक असलेल्या लसणात सल्फरचे गुण असतात आणि हे वजन कमी करण्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरतात.

कसे बनवाल हे सरबत?
साहित्य
१ लसणाची पाकळी
१ ग्रॅम हळद
१ चिमुटभर काळी मिरी पावडर
१ चमचा लिंबाचा रस
५-६ तुळशीची पाने

प्रथम लसणाची एक पाकळी सोलून घ्याय. ३० सेंकद ते १ मिनिटापर्यंत ही पाकळी तशीच ठेवून द्या. आता ग्लासभर पाणी घ्या. त्यात ही पाकळी टाका. १०-१५ मिनिटं तशीच ठेऊन द्या. त्यानंतर त्यात १ ग्रॅम हळद, चिमुटभर काळी मिरी पावडर, तुळशीची पाने व्यवस्थित मिक्स करा. वरून लिंबाचा रस टाका. 
हे सरबत तुम्ही लगेच पिऊ शकता किंवा थोड्यावेळ तसेच ठेऊन पिऊ शकता. जर थोडावेळ बाजूला ठेवल्यास यातील पोषकतत्वे व्यवस्थित मिसळली जातात आणि याचा जास्त फायदा होतो. यात तुम्हाला हवं असल्यास आलंही घालू शकता.
फक्त ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे त्यांनी हे सरबत बिलकूल पिऊ नये.

Web Title: Tired of many remedies for weight loss? Then try this ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.