वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर 'या' ६ पदार्थांना पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:51 PM2022-06-13T15:51:29+5:302022-06-13T15:56:00+5:30

शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) चे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

to avoid increased cholesterol eat these foods | वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर 'या' ६ पदार्थांना पर्याय नाही

वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर 'या' ६ पदार्थांना पर्याय नाही

googlenewsNext

कोलेस्ट्रॉल ही अलिकडे गंभीर समस्या बनली आहे. आजकाल अनेकांना याचा त्रास होत आहे. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. सामान्यत: शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणे असतात, पण यामागचे सर्वात मोठे कारण चुकीच्या खाण्याच्या सवयी असल्याचे मानले जाते.

आजकाल लोकांना बाहेरचे खायला जास्त आवडते. साखर, मैदा, कोल्ड्रिंक्स आणि तेलापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) चे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे?
टायम्सबूलने दिलेल्या माहितीनुसार, सफरचंद, जांभूळ आणि लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री आणि लिंबूमध्ये पेक्टिन नावाचा एक प्रकारचा फायबर असतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करतो. ही फळे आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत.

कोलेस्ट्रॉल कसे कमी करावं?
आजकाल बरेच लोक संपूर्ण धान्याचे (Whole grain) सेवन कमी करतात. याचे सेवन केल्याने रक्तप्रवाहातील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करून एलडीएलची पातळी कमी होण्यास मदत होते. तपकिरी तांदूळ, मुसळी आणि क्विनोआ या अद्भुत गोष्टी आहेत, ज्यांचा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या भाज्या -
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे हा उत्तम उपाय आहे. कोलेस्ट्रॉल तसेच शरीरातील इतर वाईट घटक काढून टाकण्याचे काम करणारे सर्व पोषक तत्वे भाज्यांमध्ये आढळतात. वांगी आणि भेंडीमध्ये विरघळणारे फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

सोयाबीन खा -
दररोज 25 ग्रॅम सोया प्रोटीनचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या स्किम्ड दुधाच्या जागी सोया मिल्क घेऊ शकता. याशिवाय सोयाबीनची भाजी बनवू शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करणारे अन्न - ओट्स
ओट्समध्ये बीटा-ग्लुकन्स आढळतात. हा एक विशेष प्रकारचा फायबर आहे, जो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुम्ही सकाळी नाश्त्यात ओट्स घेऊ शकता. ते बनवताना मीठ आणि साखर कमी वापरा.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डाळी खा -
डाळी हा प्रत्येक भारतीय घरातील मुख्य अन्नाचा एक भाग आहे. डाळी केवळ स्वादिष्टच नाही तर शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. कडधान्ये नियमित खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. कडधान्यांमध्ये चरबी कमी आणि फायबर आणि प्रथिने जास्त असतात.

Web Title: to avoid increased cholesterol eat these foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.