कोलेस्ट्रॉल मुळापासून नष्ट करते 'ही' पांढरी चटणी, Heart Attack पासून होईल बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:31 AM2024-04-08T11:31:50+5:302024-04-08T11:32:21+5:30
अनेकांना हे माहीत नसतं की, टेस्ट वाढवणारी ही नारळाची चटणी आरोग्यासाठीही फार फायदेशीर असते.
साऊथ इंडियातील एखादी डिश आपण खात असलो तर यात नारळाची चटणी असतेच असते. या भागात नारळाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. यामुळे पदार्थाची टेस्टही वाढते आणि सुगंधही चांगला येतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, टेस्ट वाढवणारी ही नारळाची चटणी आरोग्यासाठीही फार फायदेशीर असते.
एक्स्पर्टनुसार, नारळाची चटणी खाण्याचे अनेक फायदे असतात. नारळ आणि इतर जडीबुटींच्या मिश्रणापासून तयार चटणी इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासोबतच ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली करण्यास मदत करते.
नारळाच्या चटणीमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं, त्यामुळे याचं जास्त प्रमाणात सेवन करू नये. 2 ते 3 चमचे याचं सेवन करू शकता. अशात यापासून काय काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
पचनक्रिया सुधारते
नारळामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. जे पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करतं. नियमितपणे नारळाच्या चटणीचं सेवन केलं तर पोटदुखी, डायरिया आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. सोबतच पोटातील घातक बॅक्टेरियाही याने नष्ट होतात.
बीपी कंट्रोल राहतं
नारळ्याच्या चटणीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. याने शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो. ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या राहते. त्यांनी नियमितपणे नारळाच्या चटणीचं सेवन केलं पाहिजे. याने ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते.
कोलेस्ट्रॉल कमी होतं
नारळामध्ये फायबर भरपूर असतं. जे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. याच्या नियमित सेवनाने हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो.
ब्लड शुगर कंट्रोल राहतं
नारळाची चटणी खाल्ल्याने इन्सुलिन अधिक तयार होतं आणि यामुळे याच्या सेवनाने डायबिटीसच्या रूग्णांमध्ये वाढलेलं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते.
नारळाच्या चटणीसाठी आवश्यक सामग्री
- अर्धा कप किसलेलं ओलं नारळ
- 2 टेबलस्पून तूप किंवा तेल
- 1 टीस्पून मोहरी
- 5 ते 5 कडीपत्ते
- 2 वाळलेल्या लाल मिरच्या
- 1 टेबलस्पून उडीद डाळ किंवा भाजलेले चणे
- चवीनुसार मीठ