बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात लगेच बाहेर काढेल टोमॅटोचा ज्यूस, जाणून घ्या कसं कराल सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:40 AM2024-06-28T10:40:17+5:302024-06-28T10:40:59+5:30
Bad Cholestrol : बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं फार गरजेचं ठरतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा एक टेस्टी आणि सोपा उपाय सांगणार आहोत.
Bad Cholestrol : बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल याला कारणीभूत आहे. बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅकचा धोका खूप जास्त वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल नसांमध्ये जमा झाल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच शरीरात इतर अनेक समस्या होतात. अशात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं फार गरजेचं ठरतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा एक टेस्टी आणि सोपा उपाय सांगणार आहोत.
जगभरात हृदयरोगाच्या समस्या वाढत आहे. कमी वयातच लोकांना हार्ट अटॅक येत आहेत. ब्लड प्रेशर वाढत आहे. अशात बॅड कोलेस्ट्रॉल शरीराचं आणखी जास्त नुकसान करतं.
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारी भाजी
शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा शरीरातून बाहेर काढण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर ठरतात. काही रिसर्चनुसार, टोमॅटोमध्ये पाणी आणि मिनरल्स भरपूर असतात. टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. तसेच शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात.
काय सांगतो रिसर्च?
काही रिसर्चनुसार, रोज एक कप टोमॅटोचा ज्यू प्यायल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होऊ शकते. तसेच यातून शरीराला इतरही अनेक पोषक तत्व मिळतात ज्याने शरीराला फायदे मिळतात.
मेडिकल न्यूज टुडेच्या एका रिपोर्टनुसार, टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. रिपोर्टनुसार, एका दिवसात २५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त लायकोपीनचं सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल १० टक्के कमी होऊ शकतं.
एक्सपर्ट्सनुसार, दोन टोमॅटो थोडं पाणी टाकून बारीक करा. हे पाणी गाळून सेवन करू शकता. महत्वाची बाब म्हणजे यात मीठ टाकू नका.