सतत ढेकर येण्याचं काय असू शकतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 03:51 PM2019-04-27T15:51:27+5:302019-04-27T15:54:29+5:30

जेवल्यानंतर ढेकर येणं म्हणजे, पोट भरलं असं समजलं जातं. परंतु हेच ढेकर जर सतत येत असतील तर मात्र ते आरोग्याच्या एखाद्या समस्येचं लक्षण समजलं जातं.

Too much belching is not a good sign for stomach health | सतत ढेकर येण्याचं काय असू शकतं कारण?

सतत ढेकर येण्याचं काय असू शकतं कारण?

googlenewsNext

जेवल्यानंतर ढेकर येणं म्हणजे, पोट भरलं असं समजलं जातं. परंतु हेच ढेकर जर सतत येत असतील तर मात्र ते आरोग्याच्या एखाद्या समस्येचं लक्षण समजलं जातं. यामुळे अ‍ॅसिड रिफ्लेक्स, अ‍ॅसिडिटी आणि अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. त्यामुळे ढेकर येण्याच्या सवयीला तुम्ही सामान्य समजू नका आणि योग्य वेळीच ढेकर काय संकेत देत आहेत, हे लक्षात घेऊन वेळीच उपाय करा. 

का येतात ढेकर?

जेव्हा पोटातील वायू अन्ननलिकेमध्ये जातो, त्यावेळी तो गळा आणि तोंडातून बाहेर पडतो. त्यावेळी जो आवाज होतो. त्याला ढेकर देणं असं म्हणतात. 

ही असू शकतात कारणं : 

  • कार्बोनेटेड ड्रिंक्स, जंक फूड, कोबी, वाटाणे, डाळ यांसारखे पदार्थ पोटात गॅस तयार करतात. हे खाल्यानंतर जास्त ढेकर येतात. 
  • धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती सिगरेटच्या धुरासोबत खूप हवा आतमध्ये खेचून घेतात. ही हवा ढेकरमार्फत बाहेर निघते. 
  • अनेकदा तणावामुळे काही लोक ओव्हरइटिंग करतात. ज्यामुळे त्यांना सतत ढेकर येतात. 
  • काही लोकांच्या पोटामध्ये अल्सर झाल्यामुळे सतत ढेकर येत असतात. अशा परिस्थितीमध्ये छातीमध्ये झळझळ होते. 
  • छोट्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढल्यामुळे सतत ढेकर येण्याची समस्या सुरू होते. बॅक्टेरिया असल्यामुळे ड्यूडेनम (लहान आतड्यांचा हिस्सा) प्रभावित होतो. ज्यामुळे सतत ढेकर येण्याची समस्या सुरू होते. अशातच डॉक्टरांशी आपल्या पोटाची तपासणी सतत करतात. 
  • काही लोक पटापट जेवतात किंवा मोठे मोठे घास घेतात. याचा थेट परिणाम त्यांच्या पचनक्रियेवर होत असतो. 
  • खाताना जेव्हा आपण तोंड उघडतो त्यावेळी हवा पोटामध्ये जाते. त्यामुळेही ढेकर येतात. 
  • पोट खराब झाल्याने पोटामध्ये गॅस तयार होतो. अन्न पचवण्यासाठी मदत करणारे पोटातील बॅक्टरियांचे संतुलन बिघडल्यामुळे पोटात गॅसची समस्या होते. 

पोट रिकामं असल्यामुळे रिकाम्या पोटामध्ये हवा भरते आणि हिच हवा बाहेर येण्याचा प्रयत्न करते. त्याला ढेकर म्हणतात. 

हे उपाय करा, मिळेल आराम

  • तोंड बंद करा आणि घास चावून खा. जेवताना बोलू नका
  • पाणी, चहा किंवा इतर अनकार्बोनेटेड पेय प्या. कार्बोनेटेड पेय पदार्थांमध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होतो. 
  • जर तुम्हाला कार्बोनेटेड पेय पिण्याची इच्छा असेल तर लहान लहान घोट घ्या. त्यामुळे ढेकर येणार नाही. 
  • आपल्या आहारामध्ये गॅस तयार करणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये कमीत कमी समावेश करा. बीन्स, डाळ, ब्रोकली, फ्लॉवर, कोबी, सलाड, कांदा, चॉकलेट, सफरचंद यांसरख्या पदार्थांचा कमी समावेश करा. यामुळे पचनक्रिया सुरू असताना गॅस तयार होतो आणि ढेकर येतो. 
  • भाज्या उकडताना वाफेवर उकडा. त्यामुळे पचनक्रियेमध्ये मदत करणारे भाजीमधील नैसर्गिक एंजाइम्सस सुरक्षइत राहतात. 
  • जेवणाअगोदर आल्याच्या पावडरचं मिश्रण किंवा आल्याचा छोटासा तुकडा चावून खाल्याने ढेकर थांबवता येऊ शकतो. तुम्ही त्यासाठी आलं आणि मधाचा चहाही घेऊ शकता. 
  • एक ग्लास लिंबू पाण्यामध्ये किंवा बेकिंग सोडा एकत्र करून प्या. त्यामुळे तुम्हाला ढेकर येणार नाही. यामुळे पचनक्रियेमध्ये मदत होइल. 
  • पपईचा वापर केल्यानंतरही ढेकरची समस्या रोखण्यास मदत होते. पपईला आपल्या दैनंदिन आहाराचा हिस्सा बनवा. 
  • जेवणामध्ये एक वाटी दही खाल्याने सामान्य आणि प्राचीन भारतीय परंपरा आहे. याचं कारण म्हणजे, दही अन्न पचवण्यासाठी मदत करतं. यामध्ये असलेले बॅक्टेरिया पोटाच्या आणि आतड्याच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. याऐवजी तुम्ही ताक किंवा लस्सीचा समसावेश करू शकता. 

 

टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Too much belching is not a good sign for stomach health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.