दाताचे दुखणे होईल काही मिनिटात गायब जर कराल 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 03:07 PM2021-07-07T15:07:32+5:302021-07-07T15:08:12+5:30

दाताची योग्य रितीने काळजी घेणे आपल्या दाताच्या आरोग्यासाठीही महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक विकारांपासून दाताचा बचाव होईल. जर काही कारणांमुळे तुमचे दात दुखत असतील तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे काहीच वेळात तुमची दातदुखी कमी होईल.

Toothache will disappear in a few minutes if you do 'this' remedy | दाताचे दुखणे होईल काही मिनिटात गायब जर कराल 'हे' उपाय

दाताचे दुखणे होईल काही मिनिटात गायब जर कराल 'हे' उपाय

googlenewsNext

आपले दात हे आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहेत. काहीवेळा आपण काही खाताना दातात अन्नाचे कण अडकतात. याची वेळीच काळजी न घेतल्याने दात दुखु लागतात. दाताची योग्य रितीने काळजी घेणे आपल्या दाताच्या आरोग्यासाठीही महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक विकारांपासून दाताचा बचाव होईल. जर काही कारणांमुळे तुमचे दात दुखत असतील तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे काहीच वेळात तुमची दातदुखी कमी होईल.


लवंगाचं तेल
दाताचे दुखणं कमी करण्यासाठी लवंग अथवा लवंगाचे तेल फायदेशीर आहे. दात दुखत असल्यास १०-१५ मिनिटासाठी लवंग दाताखाली पकडा अथवा जेथे दुख आहे तेथे लवंगाचे तेल इअर बर्डच्या साह्याने हळूवार लावा. हे केल्यानंतर १५ ते २० मिनिटे जेवू अथवा पाणी पिऊ नका. हे केल्याने तुमची दातदुखी कमी होईल.

मीठाचं पाणी
तुम्ही मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता. यामुळे तोंडातील जीवाणू नष्ट होतील आणि तोंडाला आलेली सुजही कमी होईल.

मीठ आणि हळदीचं पाणी
तुम्ही एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. तुमच्या तोंडातील जीवाणू बाहेर टाकले जातील. हळद अँटीइन्फ्लेमेंटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध असते. याचा तुम्हाला फायदाच होतो.

बर्फाने शेका
तुम्ही दाताचे दुखणे कमी करण्यासाठी बर्फाने शेकु शकता. यामुळे दाताचे दुखणे कमी होईल.

पेपरमिंट टी बॅग
थंड पेपरमिंट टी बॅगमध्ये मेन्थॉलचे गुण असतात जे दाताचा त्रास कमी करतात. ज्या भागात दात दुखत आहेत त्या भागात भिजवलेल्या थंड पेपरमिंट टी बॅग १० ते १५ मिनिटे ठेवा.
 

Web Title: Toothache will disappear in a few minutes if you do 'this' remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.