सोला का डोला... 'या' बॉडी-बिल्डर महिलांशी कोण घेईल पंगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 01:18 PM2018-04-27T13:18:08+5:302018-04-27T13:18:08+5:30
या महिला बॉ़डी बिल्डर्सची सुंदर आणि बॉडी पाहून तुम्ही अवा्क व्हाल. तुमच्या मनात हाही विचार येऊ शकतो की, अशी जर फिटनेस असेल तर कोण यांच्याशी पंगा घेणार....
बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल्स यांची सुंदरता पाहून अनेकदा तुमची झोप उडाली असेल. पण आम्ही तुम्हाला अशा काही हॉट महिला बॉडी बिल्डरबद्दल सांगणार आहोत, ज्यांना पाहून तुम्ही थक्क व्हाल. याआधी इतकी फिट आणि परफेक्ट बॉडी तुम्ही केवळ पुरुषांचीच पाहिली असेल. पण या महिला बॉ़डी बिल्डर्सची सुंदर आणि बॉडी पाहून तुम्ही अवा्क व्हाल. तुमच्या मनात हाही विचार येऊ शकतो की, अशी जर फिटनेस असेल तर कोण यांच्याशी पंगा घेणार....
1) पॉलॉ नॉर्डीन -
पॉलॉ ही स्विडीश बॉडी बिल्डर असून तिने बॉडी बिल्डींग 17 वर्षांपूर्वी 1999 मध्ये सुरु केली होती. ती आता फिटनेस मॉडेल म्हणून काम करते. त्यासोबतच ती एक पर्सनल ट्रेनरही आहे. ती तिच्या बॉडी सोबतच तिच्या सुंदरतेसाठीही प्रसिद्ध आहे.
2) मुरीया वॉल्फी
ही सुंदर बॉडी बिल्डर महिला अॅरिझोनाची आहे. ती या क्षेत्रात 2000 पासून आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिने बॉडी बिल्डींग सुरु केली होती. तिने अनेक बॉडी बिल्डींग स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता आणि आता ती पर्सनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम करते.
3) ओक्साना ग्रिशिना
ओक्साना ग्रिशिना ही एक रशियन बॉडी बिल्डर आहे. जिमनॅस्टिकमधून ती बॉ़डी बिल्डींगच्या क्षेत्रात आली. ती शाळेत असतानापासून जिमनॅस्टिक करायची. 2004 पासून ती बॉडी बिल्डींगच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे.
4) ब्रुकी होलाडे
(Image Credit : Girls with Muscle)
निळ्या डोळ्यांची ब्रुकी ही महिला बॉडी बिल्डर क्षेत्रात आपल्या हॉटनेससाठी चांगलीच लोकप्रिय आहे. ब्रुकी ही अमेरिकन असून 2000 मध्ये तिने बॉडी बिल्डींग स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा जिंकली होती. ती जिमनॅस्टिक आणि डान्सर सुध्दा करते.
5) एरीका कोर्डी
एरीका ही बॉडी बिल्डींग क्षेत्रात नसली तरी तिची बॉडी तिच्या चर्चेचं कारण आहे. एरीका प्रोफेशनने एक मॉडेल आहे. एका अपघातात पायाला दुखापत झाल्यानंतर ती दुखापत दूर करण्यासाठी ती बॉडी बिल्डींगकडे वळली होती.
6) जेनिफर रीश
जेनिफर ही सुद्धा एक अमेरिकन बॉडी बिल्डर आहे. ती या क्षेत्रात येण्याआधी किक बॉक्सर आणि जिमनॅस्ट म्हणून प्रसिद्ध होती. सध्या ती कॅलिफोर्नियामध्ये फिटनेस मॉडेल म्हणून आणि नर्स म्हणून काम करते.