जिमला जाण्याचा कंटाळा येतो? मग घरीच 'या' सोप्या एक्सरसाइजने कमी करा चरबी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 10:52 AM2019-12-24T10:52:26+5:302019-12-24T10:53:18+5:30
अनेक लोक असे आहेत ज्यांना एकतर जिमला जायला वेळ नसतो तर काही लोकांना जिमला जायचं जिवावर येतो. अशात लोकांचं वजन वाढलेलं असतं.
अनेक लोक असे आहेत ज्यांना एकतर जिमला जायला वेळ नसतो तर काही लोकांना जिमला जायचं जिवावर येतो. अशात लोकांचं वजन वाढलेलं असतं. त्यामुळे अशा लोकांसाठी आम्ही काही खास घरीच करता येतील. आज आम्ही तुम्हाला काही कार्डिओ एक्सरसाइज सांगणार आहोत. याने तुम्ही स्लिम होऊ शकता, वजन कमी करू शकता आणि पोटावरील चरबी कमी शकता. चला जाणून घेऊन टॉप ७ कार्डिओ एक्सरसाइज ज्या तुम्ही घरीच करू शकता.
१) जंपिंग जॅक
कार्डिओ एक्सरसाइजमध्ये जंपिंग जॅक सर्वात महत्वाची एक्सरसाइज मानली जाते. कारण याने भरपूर प्रमाणात तुमच्या कॅलरी बर्न होतात. सोबतच या एक्सरसाइजने मांड्या मजबूत होता आणि त्यांना योग्य आकारही मिळतो. इतकेच नाही तर या एक्सरसाइजने पोट योग्य शेपमध्ये ठेवण्यासही मदत मिळते.
२) क्रॉस जॅक
कॅलरी बर्न करण्यासाठी क्रॉस जॅक एक्सरसाइजही चांगली आहे. ही एक्सरसाइज केल्याने मांड्या, बायसेप्स, ट्रायसेप्सवरील जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी केला जाऊ शकते. तसेच या एक्सरसाइजने अॅब्सही सहजपणे टोन्ड करता येतील.
३) स्पॉट जॉग्स
ही एक्सरसाइज घरात सहजपणे केली जाऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे ही एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. यात एका जागेवर उभे राहून गुडघ्यांना वाकवून एकावर एका घ्यायचे असतात. या एक्सरसाइजने हृदयाची गती वाढते आणि शरीरात रक्तप्रवाह योग्य प्रकारे होऊ लागतो.
४) स्केटर स्क्वाड
कॅलरी बर्न करण्यासाठी ही एक सर्वात चांगली एक्सरसाइज मानली जाते. सोबतच मांसपेशी ठिक करण्याचं कामातही ही एक्सरसाइज मदत करते. या एक्सरसाइजने ग्लट आणि कंबरेला चांगला शेप मिळतो. कमी शब्दात सांगायचं तर या एक्सरसाइजने संपूर्ण शरीर सुडौल आणि संतुलित राहतं.
५) स्किपिंग
स्किपिंग म्हणजे दोरीच्या उड्या. लागोपाठ २० मिनिटे ही एक्सरसाइज केल्याने साधारण २०० कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात. यासाठी घरातील कोणत्याही दोरीचा तुम्ही वापर करू शकता. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रशिक्षणाचीही गरज नसते. याने पाय, मांड्या, कंबर आणि मनगटांची चांगली एक्सरसाइज होते. शरीरात एक लवचिकताही येते.
६) जम्प लंज
ही सुद्धा एक परफेक्ट कार्डिओ एक्सरसाइज आहे. जी घरात सहजपणे केली जाऊ शकते. या एक्सरसाइजने मांड्यांच्या मांसपेशी मजबूत होतात आणि त्यांना एक शेप मिळतो. जम्प लंज करताना हृदयाची गती वाढते आणि संपूर्ण शरीरात चांगला रक्तप्रवाह होतो.
७) हाय नी मार्च
कार्डिओ एक्सरसाइजच्या श्रेणीमध्ये हाय नी मार्च करणं सर्वात सोपी आहे. पण ही एक्सरसाइज करण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. या एक्सरसाइजने तुमचे नितंब, मांड्या आणि पोटाचा शेप चांगला होतो. सोबतच शरीराची सहनशक्तीही वाढते.