आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमा झाले तर होतात या समस्या, आजच करा साफ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:17 PM2022-11-15T12:17:00+5:302022-11-15T12:17:25+5:30

Toxic gut: जर तुमचं पचनतंत्र बिघडलं असेल आणि गॅस, सूज, ढेकरसारखी समस्या होत असेल तर वेळीच सावध व्हा. त्याशिवाय थोडं खाल्ल्यावरही पोट लगेच भरत असेल तर हा संकेत चांगला नाही.

Toxic gut symptoms know signs of stomach distress | आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमा झाले तर होतात या समस्या, आजच करा साफ...

आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमा झाले तर होतात या समस्या, आजच करा साफ...

Next

Toxic gut: आतड्या शरीरात फार महत्वाचा अवयव आहे. आतड्या तोडांपासून ते मलद्वारापर्यंत पसरलेल्या असतात. त्यामुळे खाण्यापासून ते मलत्याग करण्यापर्यंत काही समस्या होत असेल तर आतड्यांमध्ये गडबड असण्याची शक्यता जास्त आहे. आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमा झाल्याने त्या बरोबर काम करत नाही. यामुळे आजार वाढू लागतात. जर पचनतंत्र योग्यपणे काम करत नसेल तर पोटात बॅक्टेरियाचं संतुलन बिघडतं. त्यामुळे आपल्या टॉक्सिक गटची लगेच ओळख पटवणे गरजेचं असतं. हे टॉक्सिक गट काही नॅच्युरल उपायांनी तुम्ही दूर करू शकता.

जर तुमचं पचनतंत्र बिघडलं असेल आणि गॅस, सूज, ढेकरसारखी समस्या होत असेल तर वेळीच सावध व्हा. त्याशिवाय थोडं खाल्ल्यावरही पोट लगेच भरत असेल तर हा संकेत चांगला नाही. पुन्हा पुन्हा अॅलर्जी होणे, थायरॉइडचं औषध काम न करणे ही आतड्यांमध्ये गडबड असण्याचे संकेत आहेत.

कशी कराल सफाई

- भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, कारण शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमा होणे सुरू होतं. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅससारखी समस्या होते. त्यामुळे पुरूषांनी दिवसांतून 3.7 लीटर तर महिलांनी 2.7 लीटर पाणी नक्की प्यावे.

- अॅपल विनेगर सुद्धा गटची सफाई करण्यासाठी फायदेशीर ठरतं. कारण यात एंजाइम आणि अॅसिड असतं. जे खराब बॅक्टेरिला मारण्यास फायदेशीर ठरतात.

- लसणानेही आतड्या डिटॉक्स करता येतात. कारण या अॅंटी-बॅक्टेरिअल गुण भरपूर असतात. त्यामुळेच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी याने फायदा मिळतो. 

- आतड्या स्वच्छ ठेवण्यासाठी दही, लोणचं याचंही सेवन करा. हे प्रोबायोटिक्स खाद्य पदार्थ असतात. ज्याने फायदा मिळतो.

Web Title: Toxic gut symptoms know signs of stomach distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.