खेळण्यांमुळे लहान मुलांना होऊ शकतात अनेक गंभीर आजार - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 11:15 AM2018-09-01T11:15:13+5:302018-09-01T11:17:51+5:30

आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारची खेळणी उपलब्ध असतात. एकेकाळी महागडी आणि चांगल्या क्वालिटीची खेळणी फक्त श्रीमंतांकडे दिसून येत पण सध्या प्लॅस्टिकचा होणारा सर्रास वापर यांमुळे कमी किमतीत खेळणी विकत घेणे सहज शक्य झालं आहे.

Toys are dangerous to your kids and even some older ones | खेळण्यांमुळे लहान मुलांना होऊ शकतात अनेक गंभीर आजार - रिसर्च

खेळण्यांमुळे लहान मुलांना होऊ शकतात अनेक गंभीर आजार - रिसर्च

Next

(Image Creadit : Pixabay.com)

आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारची खेळणी उपलब्ध असतात. एकेकाळी महागडी आणि चांगल्या क्वालिटीची खेळणी फक्त श्रीमंतांकडे दिसून येत पण सध्या प्लॅस्टिकचा होणारा सर्रास वापर यांमुळे कमी किमतीत खेळणी विकत घेणे सहज शक्य झालं आहे. आता तर बाजारामध्ये चायनिज खेळण्यांचा ट्रेन्ड दिसून येत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? याच खेळण्यांमुळे तुमच्या मुलांना अनेक गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. आता पुन्हा प्रश्न पडला असेल की, असं कसं शक्य आहे. पण खेळताना लहान मुलं खेळणी तोडांत टाकतात. यामुळेच त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. त्यानंतर बाजारात अशीही खेळणी उपलब्ध करण्यात आली आहेत, ज्यांमुळे मुलांना कोणताही धोका होत नाही. पण या खेळण्यांची किंमत साधारण खेळण्यांच्या तुलनेत दुप्पट असते त्यामुळे सर्वांनाच ही खेळणी घेणं परवडत नाही. त्याचप्रमाणे अनेक पालकांना त्यातील फरक आणि त्यांचं महत्त्वही समजत नाही.

मुलांच्या नर्वस सिस्टीमवर वाईट परिणाम

काही खेळण्यांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक तत्व असतात. पॉलीविनायल क्लोराइड पीवीसीने तयार करण्यात आलेल्या या खेळण्यांमध्ये शीसं आणि कॅडमियम असतं. जे नर्वस सिस्टिमवर वाईट परिणाम करण्यास कारणीभूत ठरतात. यामध्ये असणारी न्यूरॉटॉक्सिस आणि नेफ्रोटॉक्सिस मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. सतत ही हानिकारक तत्व खेळण्यांमार्फत मुलांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होतो. त्याचप्रमाणे ही विषारी तत्व लहान मुलांच्या किडनी आणि लिव्हरवरही परिणाम करतात. 

मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या मुलांना जास्त धोका

पीवीसीपासून तयार करण्यात आलेली खेळणी आणि सॉफ्ट टॉइजमध्ये शीशे आणि कॅडमियमची मात्रा तपासण्यासाठी त्याचप्रमाणे लहान मुलांच्या शरीरावर या खेळण्यांमुळे होणारे परिणाम तपासण्यासाठी दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या तीन मोठ्या शहरांतून खेळण्यांचे नमूने एकत्र करण्यात आले. एकूण 111 खेळण्यांच्या नमुन्यांवर अभ्यास करण्यात आला. यातील 77 खेळणी पीवीसी पासून तयार करण्यात आली होती. राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या 66 खेळण्यांपैकी 43 खेळणी पीवीसीपासून तयार करण्यात आलेली होती. मुंबईमधून निवडण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 30 नमूने पीवीसीचे होते. या प्रकरणात चेन्नईमधील 21 नमुन्यांपैकी फक्त 4 खेळणीच पीवीसीची होती. खेळण्यांमधील शीसे आणि कॅडमियम तपासण्यासाठी 84 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ज्यातील 77 खेळणी पीवीसीची होती. या खेळण्यांमध्ये सर्वात कमी प्रमाणात शीसं असलेली खेळणी चेन्नईमध्ये आढळून आली. 

महागड्या ब्रँडची खेळणी अधिक नुकसानदायक

या अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की, देशातील काही मोठ्या ब्रँडची खेळणी सोडली तर, अनेक ब्रँडच्या खेळण्यांमध्ये असलेलं  शीसं आणि कॅडमियमसारखी विषारी तत्व लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झालं आहे. जेव्हा मुलं खेळणं तोडांत टाकतात किंवा चावतात त्यावेळी खेळण्यांमधील हानिकारक तत्व त्यांच्या शरीरात जातात. त्यामुळे आई-वडिलांनी खेळणी विकत घेताना काळजी घेणं गरजेचं असतं. ज्या खेळण्यांमध्ये विषारी तत्व आढळून येत नाहीत अशीच खेळणी मुलांसाठी विकत घ्यावीत. 

Web Title: Toys are dangerous to your kids and even some older ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.