पारंपरिक आहारच श्रेष्ठ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2016 05:24 PM2016-08-27T17:24:01+5:302016-08-27T22:54:01+5:30
भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.
Next
ज भरामध्ये अल्झायमर्स आजाराची समस्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगात सुमारे ४.२ कोटी लोकांना ‘डिमेंशिया’ (वेडसरपणा) असून त्यामध्ये अल्झायमर्सचे प्रमाणा सर्वाधिक आहे. संशोधकांच्या एका गटाने केलेल्या संशोधानात दिसून आले की, भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.
मांस, गोड आणि हाय-फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या अधिक सेवनाने अल्झायसर्मचा धोका वाढतो. विशेष म्हणजे कित्येक पाश्चिमात्य देशांच्या रोजच्या आहरामध्ये या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सामावेश असतो. त्या तुलनेत भारतीय आहारात मांसाहाराचे प्रमाण खूप कमी असते. आहार आणि अल्झायमर्सचा जवळचा संबंध असतो हे जपानमध्ये केलेल्या अध्ययनातून स्पष्ट झाले.
कारण १९८४ साली जपानने पोषक आहात बदल करत पारंपरिक आहार सोडून पाश्चिमात्य आहाराचा स्वीकार केला. त्याचा परणिाम असा झाला की, १९८५ साली देशातील अल्झायमर्सचे १ टक्का प्रमाण वाढून ते २००८ साली ७ टक्क्यांपर्यंत वाढले. विल्यम ग्रँट व सहकाऱ्यांनी भारतासह इतर एकूण दहा देशांत अल्झायमर्सचा प्रादुर्भाव कसा आहे याचा अभ्यास केला. त्या त्या देशाच्या पारंपरिक आहाराचा आणि या आजाराचा कसा संबंध आहे यावरही त्यांनी संशोधन केले.