तुम्हाला कोमामध्ये पाठवू शकते ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी, जाणून घ्या लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 11:14 AM2019-06-27T11:14:52+5:302019-06-27T11:26:04+5:30

मेंदू आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अंगांपैकी एक आहे. याला जराही इजा किंवा जखम झाली तर शरीराचे इतर अंग प्रभावित होतात.

Traumatic brain injury, Know causes, symptoms and treatment | तुम्हाला कोमामध्ये पाठवू शकते ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी, जाणून घ्या लक्षणे

तुम्हाला कोमामध्ये पाठवू शकते ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी, जाणून घ्या लक्षणे

googlenewsNext

(Image Credit : University of California)

मेंदू आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अंगांपैकी एक आहे. याला जराही इजा किंवा जखम झाली तर शरीराचे इतर अंग प्रभावित होतात. सोबतच जीव सुद्धा जाऊ शकतो. दरवर्षी भारतात लाखों लोक डोक्याला गंभीर जखम म्हणजे ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीचे शिकार होता आणि अनेकांचा यात जीवही जातो. त्यामुळे डोक्याला किंवा मेंदूला झालेल्या छोट्या इजेकडे दुर्लक्ष करू नका. आज आम्ही तुम्हाला ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी आणि त्याच्या बचावाबाबत सांगणार आहोत.

mayoclinic.org ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी गाडी चालवताना अॅक्सिडेंट दरम्यान किंवा एखाद्या हिंसक घटनेदरम्यान होऊ शकते. त्यासोबतच मेंदूला खोलवर आघात झाल्यानेही ही स्थिती निर्माण होऊ शकते. यात मेंदूच्या आतील नसा फाटतात आणि ब्लीडिंग होऊ लागते. अनेकदा स्कलमध्ये फ्रॅक्चर होतो आणि ते मेंदूच्या पेशींमध्ये घुसतं. या स्थितीला ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी असं म्हणतात.

(Image Credit : Mental Floss)

ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीची लक्षणे

१) यात काही सेकंद किंवा मिनिटांसाठी व्यक्ती बेशुद्ध होतो.

२) डोकदुखी आणि उलट्या होऊ लागतात.

३) बोलण्यात अडचण येऊ लागते आणि चक्कर येऊ लागतात. शरीरावरील कंट्रोल सुटतो आणि बॅलन्स करण्यात समस्या होते.

(Image Credit : Medical News Today)

४) डोळ्यांसमोर धुसर दिसू लागतं आणि कानांमध्ये नेहमी आवाज येऊ लागतात.

५) तोंडाची चव बदलते आणि लाइट लावल्यावर किंवा मोठ्या आवाजाने त्रास होऊ लागतो.

अशात जोरात झटका लागला असेल किंवा छोटी इजाही झाली असेल तर डॉक्टरांना लगेच संपर्क करा. असही होऊ शकतं की, बाहेर जास्त जखम दिसत नसेल पण आत जखम मोठी असेल. याकडे दुर्लक्ष केल्याने डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते आणि व्यक्ती कोमामध्येही जाऊ शकते.

(Image Credit : askdoctork.com)

एका रिसर्चनुसार, मेंदूमध्ये पुन्हा पुन्हा जखम झाल्यास किंवा ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीने डिजनरेटिव्ह ब्रेन डिजीज होऊ शकतो. ज्यामुळे व्यक्ती अल्झायमर, पार्किन्स डिजीज आणि डिमेंशियाने ग्रस्त होऊ शकतो.

ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीपासून बचाव

- याप्रकारच्या इंजरीपासून बचाव करण्यासाठी ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट लावा. गाडीत एअरबॅग असाव्यात, जेणेकरून अपघात झाल्यास जखमी होऊ नये. जर सोबत लहान मुलं असतील तर त्यांना नेहमी मागच्या सीटवर बसवा.

(Image Credit : Virtual Drive of Texas)

- गाडी चालवताना मद्यसेवन किंवा ड्रग्सचं सेवन करू नका आणि मद्येसवन केल्यावरही गाडी चालवू नका. 

- टू-व्हिलर चालवताना हेल्मेट वापरा. घरातही कुठे घसरून पडू नका. त्यासाठी आवश्यक काळजी घ्या. 

- बाथरूम आणि त्याच्या आजूबाजूला मॅट ठेवा, जेणेकरुन तुम्ही घसरणार नाहीत.

Web Title: Traumatic brain injury, Know causes, symptoms and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.