झुंबा-अ‍ॅरोबिक्स ठरतोय ट्रेंडी एक्सरसाईझ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2016 05:01 PM2016-12-05T17:01:18+5:302016-12-05T17:01:18+5:30

आज धावपळीच्या जीवनात स्वताच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, व्यायाम शाळेत किंवा फिरायला एकटे जाणे कंटाळवाणे वाटते अशा लोकांसाठी झुंबा,एरोबिक्स हे नृत्य प्रकार वरदान ठरत आहे. झुम्बा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 'नृत्यासोबत व्यायाम'. एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत.

Trendy Exercise, due to Zumba-aerobics | झुंबा-अ‍ॅरोबिक्स ठरतोय ट्रेंडी एक्सरसाईझ

झुंबा-अ‍ॅरोबिक्स ठरतोय ट्रेंडी एक्सरसाईझ

googlenewsNext
धावपळीच्या जीवनात स्वताच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, व्यायाम शाळेत किंवा फिरायला एकटे जाणे कंटाळवाणे वाटते अशा लोकांसाठी झुंबा,एरोबिक्स हे नृत्य प्रकार वरदान ठरत आहे. झुम्बा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 'नृत्यासोबत व्यायाम'. एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत.
   एरोबिक्स म्हणजे आॅक्सिजनच्या सान्निध्यात किंवा आॅक्सिजन बरोबर एरोबिक व्यायाम म्हणजे असा व्यायामप्रकार ज्यामध्ये तुमच्या हद्याची गती वाढते, श्वसोच्छस्वसाचा वेग वाढतो आणि जो वेग तुम्ही कमीत कमी २० मिनिटं टिकवू शकता.   झुम्बा व एरोबिक्स या नृत्यप्रकारात संगीताचा वापर केला जातो यामुळे ते तरूणाईच्या पसंतीस उतरत आहे.  
महिलांना शारीरिक कसरतींसोबत मानसिक व्यायामाचीही गरज भासते. त्यामुळे एरोबिक आणि झुम्बा यांसारख्या व्यायाम घडवून आणणाया नृत्यप्रकारांकडे महिलांचा ओढा वाढत चालला आहे. अशा व्यायामाने शारीरिक तंदुरुस्ती तर टिकून राहतेच, शिवाय मनही प्रसन्न होत असते.  
झुम्बा हा लॅटिन अमेरिकन नृत्याचा प्रकार. याचा वापर फिटनेस रुटीन म्हणून अलीकडच्या काळात सुरू झाला. संगीताच्या तालावर केलेल्या लयबद्ध हालचालींमधून व्यायाम होतो. वेगळे संगीत आणि ग्रुप एक्सरसाइझची धमाल यामुळे तरुण पिढी झुम्बाकडे आकर्षित झाली आहे. आपल्याकडे गेल्या दोन-तीन वर्षांत लोकप्रिय झालेला हा प्रकार सध्याचा सगळ्यात ट्रेण्डी फिटनेस एक्सरसाइज म्हणून पुढे येत आहे. अनेक फिटनेस क्लबमधून हल्ली झुम्बा क्लासेस घेतले जातात. एका महिन्यासाठी दोन हजार किंवा त्याच्यापेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात. 

  

मात्र, सध्या आरोग्य उत्तम ठेवणा्या 'झुबा' नृत्य आणि एरोबिक्सचे मिश्रण करून तयार करण्यात आलेला े. 'झुंबा'ही कोलंबीयातील अल्बट्रो पेरेज यांची देणगी आहे. त्यांनीच १९९० मध्ये हा नृत्य प्रकार सुरू केला. 'झुंबा'ला आरोग्याच्या दृष्टीने   झुंबा एरोबिक्स नृत्य प्रकार असल्यामुळे यातून व्यायामासह डान्सही करता येतो. . आरोग्यवर्धक नृत्य प्रकार असल्याने हा डान्स करण्यासाठी वयाचे कसलेच बंधन नाही.' झुंबा म्हणजे काय? नृत्य, एरोबिक्स आणि संगीत अशा त्रिवेणी संगमातून झुंबा डान्सची निर्मिती झाली आहे. या डान्स प्रकारात केवळ डान्सच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम प्रकारही शिकवले जातात. 'झुंबा'त अनेक डान्स प्रकार आहेत. पाण्यामध्येही हा डान्स प्रकार केला जातो. त्याच्या स्टेप्सही वेगवेगळ्या आहेत. झुंबा करीत असताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. 
असे आहेत प्रकार.. पाण्यात केला जाणारा अक्वा झुंबा, वजन हातात घेऊन केला जाणारा झुंबा, स्टेप बोर्डवर केला जाणारा झुंबा, असे झुंबाचे विविध प्रकार आहेत. स्ट्रेचिंग, बेंडिंग असे विविध शारीरिक व्यायामांनी युक्त अशा स्टेप्स या नृत्य प्रकाराद्वारे केल्या जातात.   झुंबा डान्स विशिष्ट अशा संगीतावर केला जातो. एक तास झुंबा केल्यास शरीरातील सुमारे ५०० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. जिममध्ये शरीरातील काही अवयवांचा तर झुंबामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. संगीताच्या तालावर शिकविल्या जाणा्या झुंबामुळे शरीर सुडौल राहते. रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होऊन वजन कमी होण्यासही मदत होते. ह्रदयाचे ठोके सुधारतात. 
 सत्तरच्या दशकातच परदेशात एरोबिक्स लोकप्रिय होऊ लागले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या गरजेनुसार इतर प्रकार शोधून काढायला सुरुवात केली.  पण झुंबा असो की बॉलीवूड डान्स. सगळ्याचा पाया एरोबिक्स हाच,एरोबिक्स म्हटलं की म्हणजे तालबद्ध कवायत डोळ्यासमोर येते. पण उगीचंच कशाही उडा मारणे किंवा इकडे-तिकडे वळून व्यायाम करणे म्हणजे एरोबिक्स नव्हे. हा प्रकार खूप व्यवस्थित आणि विचारपूर्वक ठरवलेल्या स्टेप्सवर करायचा असतो. रोज तेच तेच करायचा कंटाळा येऊ नये म्हणून सतत वेगवेगळ्या काँबिनेशन्समध्ये हालचाली केल्या जातात. त्यामुळे आज एरोबिक्समध्ये नवीन काय करणार याची उत्सुकता टिकून राहते.
एरोबिक्समध्ये फ्लोअर एरोबिक्स व बेंच एरोबिक्स असे दोन प्रकार आहेत. झुंबा या प्रकारात एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर ठरावीक पद्धतीने बसवलेल्या नृत्यासारख्या स्टेप्स केल्या जातात. यातली संगीत व गाणी ठरलेली असतात. संगीत हेच झुंबाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पुढची ३० ते ४० मिनिटे व्यायाम करायचा असल्याने तो गरजेचा असतो. यात रोज हिंदी चित्रपटातील वेगळे गाणे घेऊन त्यावर शरीराला व्यायाम होईल अशा प्रकारे नाचाच्या स्टेप्स बसवल्या जातात.
एरोबिक्समुळे ताजेतवाने, फ्रेश वाटते कारण मेंदूकडील रक्तपुरठाही सुधारतो. डिप्रेशन कमी होते. पण प्रत्यक्ष मेंदूला काही व्यायाम घडत नाही. आपल्या मेंदूला फिट ठेवायचे असेल, बुद्धी व स्मृती वाढवायची असेल, स्मृतीभ्रंश, अल्झायमरसारख्या महाभयंकर आजार टाळायचा असेल तर विशिष्ट व्यायाम करायला हवा. मेंदूला व्यायाम घडवणा-या कृती म्हणजेच न्यूरोबिक्स!
एरोबिक्समुळे हृदयाला व फुफ्फुसांना व्यायाम मिळतो. त्यांचे आरोग्य चांगले राहते. हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. पण स्मृतीभंशाचा धोका कमी होत नाही. आपल्या शरीरात मेंदू हादेखील अतिशय महत्त्वाच अवयव आहे. त्याला व्यायाम कसा घडवायचा., त्याची क्षमता कशी वाढवायची? एरोबिक्समुळे ताजेतवाने,  वाटते कारण मेंदूकडील रक्तपुरवठाही सुधारतो. डिप्रेशन कमी होते, प्रत्यक्ष मेंदूला काही व्यायाम घडत नाही. 
  हालचाली करताना शरीराला चांगला रक्तपुरवठा व्हावा लागत असल्यामुळे अर्थातच हृदयाचे काम वाढते. प्राणवायू अधिक घ्यावा लागतो त्यामुळे श्वासोश्वासही वाढतो. ३ ते ४ महिने सातत्याने हे व्यायाम केल्यानंतर शरीराचा स्टॅमिना वाढल्याचे जाणवू लागते.


 1)उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हे व्यायाम करता येतात. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यायामांनी काही प्रमाणात कमी करता येतात.
2)एरोबिक्स व नाचाच्या व्यायामात सांध्यांनाही चांगला व्यायाम होतो. भविष्यात संधिवात, हाडे ठिसूळ होणे या गोष्टी टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
3)चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजन कमी व्हायला याची मदत होते. पण अर्थात वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीच्या आहाराचाही मोठा भाग असतो. कमी झालेले वजन कमी राखण्यासाठी हे व्यायाम व जोडीने वेट ट्रेनिंगसारखे इतर व्यायामही सुचवले जातात.
 

एरोबिक्समुळे हृदयाला व फुप्फुसाला व्यायाम मिळतो. 
हृदयविकाराच्या झटक्याचा तसेच स्मृतिभंशाचा धोकाही कमी होतो. 
त्यात लॅटिन- अमेरिकन नृत्य व्यायाम प्रकारांना महिला अधिक पसंती देत आहेत, 
हर्षल कुलकर्णी
रॉकी पुनावाला हेल्थ कल्ब 


आम्ही आर फिटनेस मध्ये १२ बॉलीवुड गाण्यांवरती एक तास व्यायाम करून घेतो.ं व
 नाचात पाय आणि हाताच्या हालचाली खूप असतात. 
पुन:पुन्हा झालेल्या एकाच प्रकारच्या हालचालींमुळे स्नायूंना उत्तम व्यायाम होतो 
आणि स्नायू पिळदार होतात. 
तुजा रोडे
आर फिटनेस क्लब

नाचताना घाम खूप येतो आणि शरीरातील नको असलेली ,
द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरात स्त्रवणाया संप्रेरकांची यंत्रणा,
 चयापचय क्रिया सुधारते, चांगली भूक लागू लागते.
इतर कोणताही विचार न करता तासभर पूर्ण लक्ष देऊन नाचाचा व्यायाम करताना अक्षरश: 
प्राणायाम केल्यावर जसा शांत अनुभव मिळतो तसाच अनुभव येतो. हलके,
 ताजेतवाने वाटू लागते.
राहील चौहान

Web Title: Trendy Exercise, due to Zumba-aerobics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.