काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 09:59 AM2018-11-30T09:59:33+5:302018-11-30T09:59:37+5:30

तुम्हाला ऑफिसमध्ये कधी फार जास्त थंडी जाणवते आणि ऑफिस बाहेर येताच तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं. अनेकदा ऑफिसमध्ये सर्दी होणे, शिंकणे या गोष्टी होतच असतात.

Tricks to prevent office cold | काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव?

काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव?

Next

तुम्हाला ऑफिसमध्ये कधी फार जास्त थंडी जाणवते आणि ऑफिस बाहेर येताच तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं. अनेकदा ऑफिसमध्ये सर्दी होणे, शिंकणे या गोष्टी होतच असतात. पण थोडावेळ बाहेर आल्यावर तुम्हाला बरं वाटतं. हे सगळं तुम्ही ऑफिस कोल्डने ग्रस्त असल्यामुळे होऊ लागतं. सर्दी आणि थंडी या दोन्ही समस्या संसर्गजन्य आहेत. म्हणजे तुम्हाला सर्दी असेल तर तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांनाही ते होणार. या प्रकारचं इन्फेक्शन हे ऑफिससारख्या जागांवर वेगाने पसरतं. अशात यापासून वाचण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

शरीस हायड्रेट ठेवा

हे तर सर्वांनाच माहीत आहे की, पाणी हे केवळ तहान भागवत नाही तर वेगवेगळ्या समस्यांवर औषधासारखं काम करतं. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात तर आजाराने होणारं डिहायड्रेशन दूर होतं. आणि शरीरात पाण्याचा स्तर योग्य राहतो. 

हात स्वच्छ करा

कोणत्याही संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे जर्म-फ्री राहणे. नियमीतपणे चांगल्याप्रकारे साधारण २० सेकंद हात धुतल्यास हातांवरील बॅक्टेरिया दूर होतात. असे केल्याने तुम्हाला फायदा तर होईलच सोबतच तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही समस्या होणार नाही. 

छोटे ब्रेक घ्या

८ तासांच्या कामाच्या वेळेत थोडं चालणे आणि थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही जागेवरुन न हलता अनेक तासांपासून सतत काम करत असाल तर स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. याने आपलं शरीर संवेदनशील होतं आणि तुम्ही सहज थंडी-सर्दीच्या जाळ्यात अडकता. त्यामुळे स्ट्रेसपासून बचाव करण्यासाठी मधे-मधे ब्रेक घ्या.

कॉफी नाही ग्रीन टी घ्या

तुमच्या सकाळच्या कॉफीच्या जागी ग्रीन टी घेणे सुरु करा. याने तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होतील. कारण ग्रीन टी मधील अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. याने तुमचा संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.

एक्सरसाइज

एक्सरसाइज केवळ फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी नसते. जर तुम्हाला वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर यासाठीही एक्सरसाइज फायदेशीर ठरते. एक्सरसाइज केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढती आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं.
 

Web Title: Tricks to prevent office cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.