टूथपेस्ट आणि साबणामुळे होऊ शकतो कॅन्सर - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 03:38 PM2018-09-12T15:38:35+5:302018-09-12T15:39:06+5:30

आपण दररोज वापरत असलेली टूथपेस्ट आणि हात धुण्यासाठी वापरत असलेला साबण कॅन्सरचं कारण बनू शकतात. ऐकून धक्का बसला ना?

triclosan may cause cancer | टूथपेस्ट आणि साबणामुळे होऊ शकतो कॅन्सर - रिसर्च

टूथपेस्ट आणि साबणामुळे होऊ शकतो कॅन्सर - रिसर्च

Next

आपण दररोज वापरत असलेली टूथपेस्ट आणि हात धुण्यासाठी वापरत असलेला साबण कॅन्सरचं कारण बनू शकतात. ऐकून धक्का बसला ना? एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, या दोघांमध्ये असलेलं अॅन्टी बक्टेरिअल आणि अॅन्टी फंगल तत्व ट्रायक्लोसनच्या वापरामुळे मोठ्या आतड्यांना सूज येते आणि त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांनाही आमंत्रण मिळतं. 

संसोधनादरम्यान, ट्रायक्लोसनचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला. संशोधनात असं सिद्ध झालं की, थोड्या वेळासाठी ट्रायक्लोसनच्या फार कमी प्रमाणामुळेही त्यांच्या आतड्यांना सूज येऊ लागली आणि आतड्यांशी संबंधित आजार वाढू लागला. कालांतराने आतड्यांशी संबंधित कॅन्सरही उंदरांमध्ये दिसून आला. 

अमेरिकेच्या मॅसाचुएट्स-एमहेस्र्ट युनिवर्सिटीतील गुओडोंग झांग यांनी सांगितले की, 'या परिणामांमुळे पहिल्यांदा समजलं की, ट्रायक्लोसनचा आतड्यांवर परिणाम होतो.' मागील शोधातून असं सिद्ध झालं होतं की, ट्रायक्लोसनचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे विषबाधाही होऊ शकते. परंतु शरीरावर याच्या कमी प्रमाणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत काहीही माहिती हाती लागली नव्हती.'

या नवीन संशोधकांच्या दलाने उंदरांना ट्रायक्लोसनच्या विविध प्रमाण असलेले पदार्थ खाण्यासाठी दिले. त्यामुळे उंदरांची परिस्थिती फार गंभीर होत गेली. त्यातून ट्रायक्लोसनमुळे अनेक गंभीर आजार होतात हे सिद्ध झालं. 

Web Title: triclosan may cause cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.