चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्रासला आहात? हे घरगुती उपाय करा, पिंपल्स आणि चिंता दोन्ही दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 05:00 PM2021-06-21T17:00:09+5:302021-06-21T17:00:44+5:30
नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेकरिता जास्त योग्य आहेत. आम्ही तुम्हाला असेच नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जे पिंपल्स एका रात्रीत तुमचे पिंपल्स दूर करतील.
आपल्या शरीरावर इतर त्वचेपेक्षा आपल्या चेहऱ्यावरील त्वचा ही अधिक संवेदनशील असते. त्यामुळे, सावधगिरीने वागणं जास्त गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरावर नुकतेच पिंपल्स येण्यास सुरुवात झाली असेल तर, तुम्ही सर्वात पहिल्यांदा नैसर्गिक उपचार शोधण्याचा प्रयत्न करा. तुमची त्वचा ही अतिशय संवदनशील असल्यामुळे, नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेकरिता जास्त योग्य आहेत. आम्ही तुम्हाला असेच नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जे पिंपल्स एका रात्रीत तुमचे पिंपल्स दूर करतील.
कोरफड जेल
चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय म्हणजे कोरफड जेल. यामध्ये किटाणू, व्हायरस आणि फंगस यांच्याशी दोन हात करणारे, अँटी-इन्फ्लेमेटरी फॅटी अॅसिड्स (कोलेस्ट्रॉल, कँम्पेस्ट्रॉल आणि बी-सायटोस्ट्रॉल याचा समावेश असतो. रात्रभर त्वचेवर कोरफडीचे जेल लावावे. सकाळी चेहरा धवून टाकावा.
बर्फ
बर्फ हा पिंपल्स घालवण्याचा सोपा उपाय आहे. यासाठी बर्फ पातळ कपड्यात गुंडाळून चेहऱ्यावर लावावा. २० सेकंदापेक्षा जास्त तो चेहऱ्यावर ठेऊ नये. हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता. पिंपल्स गायब होतील.
मध
हळद, दही आणि मधाचं मिश्रण करावं लागेल. कच्च्या मधामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी घटकांचं प्रमाण असतं, तर दह्यामध्ये नैसर्गिक घटक असतात जे तुमच्या चेहऱ्यावर चांगलं स्क्रब करू शकतात आणि हळद तुमच्या त्वचेला अधिक उजळवते. या तिघांचं मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लागल्यानंतर मुरूमं येण्याची संधीच नाही.
ग्रीन टी
ग्रीन टी बॅग फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी. ही थंड ग्रीन टी बॅग रात्रभर चेहऱ्यावर ठेवावी. ग्रीन टीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी घटक असतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुज आणि लालसरपणा कमी होतो.