मानेवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेस्ट घरगुती उपाय, या 4 पद्धतीने दूर करा ही समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:03 PM2022-06-22T15:03:27+5:302022-06-22T15:03:38+5:30

Home remedy for dark neck : मान काळी होऊ नये यासाठी घरातून बाहेर निघताना चेहरा आणि मानेचा भाग पूर्णपणे कव्हर करा, जेणेकरून उन्ह लागणार नाही. त्यासोबतच मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही अ‍ॅलोवेरा जेलचा वापर करू शकता. 

Try aloe vera gel as home remedy to get rid of dark neck | मानेवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेस्ट घरगुती उपाय, या 4 पद्धतीने दूर करा ही समस्या

मानेवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेस्ट घरगुती उपाय, या 4 पद्धतीने दूर करा ही समस्या

googlenewsNext

Home remedy for dark neck : उन्हामुळे आणि घामामुळे मानेवर काळे डाग पडतात, ज्यामुळे तेवढी त्वचा शरीरापासून पूर्णपणे वेगळी दिूसू लागते. उन्हाळ्यात ही समस्या फारच कॉमन आहे. पण यापासून वाचण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात. मान काळी होऊ नये यासाठी घरातून बाहेर निघताना चेहरा आणि मानेचा भाग पूर्णपणे कव्हर करा, जेणेकरून उन्ह लागणार नाही. त्यासोबतच मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही अ‍ॅलोवेरा जेलचा वापर करू शकता. 

- अ‍ॅलोवेरा जेल वेगवेगळ्या ब्युटी ट्रीटमेंटमध्ये कामी येतं. हे तुम्हाला कोणत्याही गार्डनमध्ये सहजपणे मिळू शकेल किंवा तुम्ही ते लावू शकता. अ‍ॅंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असणारं अ‍ॅलोवेरा मान काळी करणाऱ्या एंजाइमला लॉक करतं. याने हळूहळू मानेचा काळपटपणा कमी होतो. यासाठी रोज अ‍ॅलोवेरो जेल काढून 15 ते 20 मिनिटे मानेची मालिश करावी लागेल.

- अ‍ॅलोवेरा आणि काकडीचा वापर करूनही तुम्ही मानेचा काळपटपणा दूर करू शकता. अ‍ॅलोवेरा जेल आणि काकडीचा रस एकत्र करून लावल्यानेही मानेचा काळपटपणा दूर होतो. हे एकत्र लावल्याने त्या भागात चमक येते. सोबतच त्वचेचा कोरडेपणाही दूर होतो.

- अ‍ॅलोवेरा आणि मुलतानी मातीनेही तुम्ही काळी झालेली मान चमकदार बनवू शकता. यासाठी मुलतानी माती, अ‍ॅलोवेरा जेल आणि गुलाब जल मिश्रित करून एकत्र करा. हे मिश्रण मानेवर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने मान धुवून घ्या. हे आठवड्यातून दोन वेळा करा.

- मानेवर काळेपणा उन्ह आणि घामासोबत तेथील सफाई व्यवस्थित न केल्यानेही येतो. त्यामुळे आंघोळ करताना मानेवरील मळ कापडाने घासून काढा. हे नियमित केल्यानेही मानेवर काळेपणा येणार नाही.

Web Title: Try aloe vera gel as home remedy to get rid of dark neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.