खुर्चीवर बसण्याची 'ही' साधी टेस्ट करुन पाहा, तुम्ही दिर्घायुषी आहात का? हे चटकन समजेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:45 PM2021-12-06T17:45:54+5:302021-12-06T17:46:07+5:30
तुम्ही दीर्घायुषी होण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? नसतील केले तर ब्रिटीश टेलिव्हिजन निर्माते डॉ. मायकल यांनी सुचवलेली पद्धत नक्की वापरून पाहू शकता.
आपल्या सर्वांनाच माहित आहे की योग्य व हेल्दी आहार केवळ तुम्हाला निरोगीच ठेवत नाही. तर उलट यामुळे तुम्ही दीर्घायुष्यही होऊ शकता. अशा परिस्थितीत तुम्ही दीर्घायुषी होण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? नसतील केले तर ब्रिटीश टेलिव्हिजन निर्माते डॉ. मायकल यांनी सुचवलेली पद्धत नक्की वापरून पाहू शकता.
टेस्ट करण्याची पद्धत
- सर्वप्रथम एक अशी खुर्ची घ्या ज्याला आर्म रेस्ट नसेल
- आता या खुर्चीवर बसा
- मग बघा एका मिनिटात तुम्ही किती वेळा उभे राहू शकता आणि बसू शकता.
१९९९ मध्ये आयोजित केलेल्या अशाच एका अभ्यासात ५० वर्षांवरील २७६० पुरुष आणि महिलांचा समावेश होता. या अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक एका मिनिटात फक्त २३ वेळा उठून परत खुर्चीवर बसू शकतात त्यांच्या तुलनेत जे लोक एका मिनिटात ३६ वेळा उठून परत खुर्चीवर बसू शकतात ते १३ वर्षे जास्त जगतात.
दीर्घायुष्य जगण्यासाठी अशी करा टेस्ट
डॉक्टर मॉस्ले यांनी त्यांच्या आधीच्या एका लेखात या चाचणीबद्दल सांगितले आहे, ज्यामध्ये खुर्चीवर बसून तुम्ही तुमच्या म्हातारपणाकडे योग्य मार्गाने जात आहात की नाही हे कळू शकते. याशिवाय तुम्ही किती वर्षे जगू शकता हे देखील समजू शकते. ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी एका पायावर उभं राहिल्याने तुम्ही किती निरोगी आहात हे समजतं. कदाचित आतापर्यंत तुम्ही एका पायावर उभे राहून चाचणी केली असेल. पण आज खुर्चीच्या माध्यमातून ही चाचणी करून बघूया.
इतर टेस्ट कोणत्या आहेत?
१ मिनिटात खुर्चीवर बसणे आणि पुन्हा उभे राहणे याव्यतिरिक्त संशोधनात असेही दिसून आले आहे की एका पायावर उभे राहणे हे देखील सांगू शकते की तुम्ही किती निरोगी आहात आणि तुम्ही किती काळ आयुष्य जगू शकता. यामध्ये व्यक्तीला एका पायावर डोळे मिटून उभे राहावे लागते. या चाचणीतील काही सहभागींना १३ वर्षांनंतर कर्करोग किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. या परीक्षेत डोळे मिटून एका पायावर उभे राहून वेळ एकदम अचूकपणे बघायचा असतो. वेळे मोजताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. तसेच तुम्ही ही चाचणी तीन वेळा करू शकता आणि त्याची सरासरी वेळ पाहून तुम्ही किती निरोगी आहात आणि तुम्ही किती काळ जगू शकता हे शोधू शकता.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर एखादी व्यक्ती या स्थितीत १० सेकंद किंवा त्याहून अधिक काळ राहू शकते, तर त्या व्यक्तीचा पुढील १३ वर्षांत मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. तर जे एका पायावर दोन सेकंद किंवा त्याहून कमी वेळ सुद्धा एका पायावर उभे राहू शकत नाहीत त्यांचा मृत्यू लवकर ओढावण्याचा धोका असतो. याशिवाय डॉक्टर मॉस्ले यांनी हेही सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीसाठी कोणत्या वयानंतर एका पायावर डोळे बंद करून किती वेळ उभे राहणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. तुमचे वय ४० मध्ये असल्यास, तुमच्यासाठी १३ सेकंद उभे राहणे पुरेसे आहे. त्याचवेळी, वयाच्या ५० नंतर ८ सेकंद उभे राहणे पुरेसे असेल. तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ४ सेकंद पुरेसे असतील. तुम्हीही ही चाचणी करून पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही किती वेळ उभे राहू शकलात.