त्वचा चमकदार बनवण्यासाठी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 02:50 PM2018-07-31T14:50:45+5:302018-07-31T14:55:23+5:30

आपलं सौंदर्य जपण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. अनेकदा चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यात येतो. अनेकदा या सौंदर्य प्रसाधनांमुळे त्वचेला अनेक साईडइफेक्टस होतात.

Try these things to beautify your skin | त्वचा चमकदार बनवण्यासाठी करा 'हे' उपाय!

त्वचा चमकदार बनवण्यासाठी करा 'हे' उपाय!

googlenewsNext

आपलं सौंदर्य जपण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. अनेकदा चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यात येतो. अनेकदा या सौंदर्य प्रसाधनांमुळे त्वचेला अनेक साईडइफेक्टस होतात. पण बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा आयुर्वेदाचा वापर करणं नेहमी फायदेशीर ठरतं. आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही निरोगी आणि तजेलदार त्वचा मिळवू शकता.

1. भाज्यांचा आहारात समावेश करणं आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर असतं. गाजर, काकडी, मूळा आणि कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये टीडोसिक अॅसिड मुबलक प्रमाणात असतं. जे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करतं. दररोज या भाज्यांचं सेवन केल्यानं त्वचा साफ आणि तजेलदार होते. 

2. ज्या पदार्थांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असते त्या पदार्थांचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. सकाळच्या नाश्त्यामध्ये अक्रोड आणि नट्सचे सेवन केल्यानं शरीराला मुबलक प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर मिळतं. ज्यामुळे त्वचेच्या सर्व तक्रारी दूर होऊन त्वचेला तजेला मिळतो.

3. जर तुम्हाला तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी बनवायची असेल तर सकाळी अनोशापोटी लिंबाचा चहा घ्या. लिंबाच्या चहामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. याचे सेवन केल्यानं पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

4. दररोज क्लिंजिंग आणि मॉश्चरायजर केल्यामुळे त्वचा तरूण राहण्यास मदत होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेवर नारळाच्या तेलाने मसाज करा. असे केल्याने त्वचेमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरातील पाण्याती कमतरताही भरून निघेल.

Web Title: Try these things to beautify your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.