वजन कमी करण्यासाठी योगा करताय? तर ही हेल्दी ड्रिंक्स सोबत प्यायल्याने मिळेल लवकर रिझल्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 06:04 PM2022-06-19T18:04:23+5:302022-06-19T18:06:41+5:30

योगासनांच्या सत्रापूर्वी आणि नंतर तुम्ही घेतलेली हेल्दी ड्रिंक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे हेल्दी ड्रिंक्स (Healthy Drinks) योगाने मिळणाऱ्या फायद्यांमध्ये भर घालतात. योगासनांपासून मिळणारे फायदे वाढवण्यासाठी हे ड्रिंक्स नक्की घ्या..

try this healthy drinks with yoga for better results | वजन कमी करण्यासाठी योगा करताय? तर ही हेल्दी ड्रिंक्स सोबत प्यायल्याने मिळेल लवकर रिझल्ट

वजन कमी करण्यासाठी योगा करताय? तर ही हेल्दी ड्रिंक्स सोबत प्यायल्याने मिळेल लवकर रिझल्ट

Next

गेल्या काही वर्षांतयोगासने आणि योगा करणे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी अनेकजण आता योगा करण्याचा मार्ग निवडत आहेत. योगाची आसने लवचिकता, सामर्थ्य, जीवनातील संतुलन आणि सुसंवाद साधण्यास मदत करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी म्हटल्याप्रमाणे योगा (Yoga For Health) म्हणजे शून्य बजेटसह आरोग्याची हमी आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. विशेषत: कोविड-19 महामारीनंतर लोक आता आपल्या आरोग्याविषयी जास्त सजग झाले आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम महत्त्वाचा असला तरी चांगला आहार राखणे आणि हायड्रेटेड राहणे हे एकंदर आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. योगासनांच्या सत्रापूर्वी आणि नंतर तुम्ही घेतलेली हेल्दी ड्रिंक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे हेल्दी ड्रिंक्स (Healthy Drinks) योगाने मिळणाऱ्या फायद्यांमध्ये भर घालतात. योगासनांपासून मिळणारे फायदे वाढवण्यासाठी हे ड्रिंक्स नक्की घ्या..

मध मिसळलेले गरम पाणी :
दिवसाच्या सुरुवातीला एक कप गरम पाण्यात मध घालून ते प्या (Warm water And Honey). आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी ही सर्वोत्तम कृती आहे. मधाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्वरित वाढते. हे केवळ तुमची पचनसंस्था सुधारत नाही तर जलद गतीने वजन कमी करण्यास देखील मदत करेल.

नारळ पाणी :
अनेक योग साधक त्यांच्या योगा सत्रांनंतर नारळाचे पाणी (Coconut Water) पितात. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते जे तणावाचे व्यवस्थापन करण्यास आणि स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करते. हे तुम्हाला त्वरित ऊर्जा देते आणि तुमच्या त्वचेसाठीदेखील ते उत्तम असते.

आल्याचा चहा :
सर्दी झाल्यास आपल्यापैकी अनेकजण आल्याचा चहा (Ginger Tea) पितात. आल्याचा चहा जगभरात विशेषतः भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर प्रभावी औषधी वनस्पती म्हणून ओळखला जातो. आल्याचा चहा श्वसन, पाचक आणि रक्ताभिसरण प्रणालींमध्ये मदत करतो. आल्याचा चहा घेतल्याने वजनावर फायदेशीर प्रभाव पडतो असेही संशोधनात दिसून आले आहे.

लिंबू पाणी :
दिवसभरात पुरेसे पाणी न पिल्याने बऱ्याच लोकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. योगासनापूर्वी लिंबू पाणी (Lemon Water) पिल्याने तुम्ही हायड्रेटेड राहाल. यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करेल.

Web Title: try this healthy drinks with yoga for better results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.