Turmeric bandage : भारतीय वैज्ञानिकांनी बनवलं हळदीचं बँडेज; जखम लवकर बरी होण्यासह डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:16 PM2021-03-24T17:16:59+5:302021-03-24T17:48:35+5:30

Turmeric bandage odisha scientist : रक्तातील साखरेची नियमित पातळी नसल्यामुळे जखम बरी होण्यास जास्त वेळ लागतो किंवा कधीकधी ऑपरेशन करणं ही कठीण ठरतं.

Turmeric bandage : Odisha Scientist heal wounds faster even for diabetic patients | Turmeric bandage : भारतीय वैज्ञानिकांनी बनवलं हळदीचं बँडेज; जखम लवकर बरी होण्यासह डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर

Turmeric bandage : भारतीय वैज्ञानिकांनी बनवलं हळदीचं बँडेज; जखम लवकर बरी होण्यासह डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर

googlenewsNext

दैनंदिन जीवन जगत असताना, प्रवास करताना जखमा होण्याची खूप शक्यता असते. जखम झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे बँडेज. प्रत्येकाच्या बॅगेत बँडेज असतंच, डायबिटीस किंवा उच्च रक्तातील साखरेच्या पातळीसह जगणार्‍या लोकांना सर्वात मोठी चिंता म्हणजे जखम. रक्तातील साखरेची नियमित पातळी नसल्यामुळे जखम बरी होण्यास जास्त वेळ लागतो किंवा कधीकधी ऑपरेशन करणं ही कठीण ठरतं.

ओडीसामधील शास्त्रज्ञांनी हळदीची मलमपट्टी (Turmeric bandag) विकसित केली असून  ही मलमपट्टी मधुमेहाच्या रूग्णांच्या जखमा जलद बरे करू शकतो असा दावा केला जात आहे. भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेसच्या डॉ. संजीव साहो आपल्या वैज्ञानिकांच्या टीमसह हळदीवर आधारित पट्टीचा नमुना तयार केला आहे.

या बँडेजनं कसा फायदा होणार?

डॉ. साहो यांनी तयार केलेले बायोडिग्रेडेबल मलमपट्टीमध्ये पॉलिमर वापरले गेले आहे. नॅनोपार्टिक्युलेट कर्क्यूमिन (हळदीचे रेणू) फॉर्म्युलेशन जखमेच्या ठिकाणीच शोषले जाऊ शकते. ''या विषयावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत ज्यात असे म्हटले आहे की कर्क्यूमिन डायबिटीसच्या जखमांना बरे करू शकते. आम्हाला आशा आहे की भविष्यात आम्ही हे सिद्ध करू शकतो की ही मलमपट्टी जखमांना बरे करण्यास मदत करू शकते,'' असे संजीव साहू यांनी सांगितले.  आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

या मलमपट्टीमध्ये वापरण्यात येणारे बायोडेग्रेडेबल सामान आणि अल्जीनेट पॉलिमर जखमेच्या ठिकाणी शोषून घेईल. जखम, रक्ताच्या गुठळ्या आणि जळलेल्या जखमांसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. भारत, अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमध्ये या मलमपट्टीला पेटंट देण्यात आलं आहे. साहू आणि त्याच्या टीमने विकसित केलेल्या प्रोटोटाइपच्या आधारे, जयपूरस्थित गोलप फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या वर्षाच्या अखेरीस मलमपट्ट्या व्यावसायिकरीत्या तयार करणार आहे. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

हळदीतील करक्युमिन नावाच्या रसायनामुळे शरीराची सूज कमी करण्यास मदत होते. शरीरावर कितीही सूज असली, तरी हळदीचे पाणी प्यायल्यास ती कमी होते. त्याशिवाय करक्युमिनमुळे सांधेदुखी दूर करण्यासाठी मदत होते. हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते. म्हणून कोरोनासोबत जगत असताना तुम्हाला आजापासून लांब राहायचं असेल तर नेहमी सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात हळद मिसळून या पाण्याचे सेवन करणं उत्तम ठरतं.

Web Title: Turmeric bandage : Odisha Scientist heal wounds faster even for diabetic patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.