​ट्विंकल खन्नाने सांगितले स्वत:ला फ्रेश ठेवण्याचे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 11:51 AM2017-06-13T11:51:01+5:302017-06-13T17:21:01+5:30

नुकतेच ट्विंकलने फ्रेश राहण्याचे रहस्य आपल्या चाहत्यांना शेअर केले आहे. ती म्हणते की...

Twinkle told Khanna to seal himself! | ​ट्विंकल खन्नाने सांगितले स्वत:ला फ्रेश ठेवण्याचे रहस्य !

​ट्विंकल खन्नाने सांगितले स्वत:ला फ्रेश ठेवण्याचे रहस्य !

googlenewsNext
विंकल खन्ना एक पत्नी, आई, लेखिका आणि आता चित्रपट निर्मातीच्या रुपात आपली जबाबदारी प्रकर्षाने निभवित आहे. एवढा व्याप सांभाळूनही ट्विंकल नेहमी फ्रेश असते. नुकतेच ट्विंकलने फ्रेश राहण्याचे रहस्य आपल्या चाहत्यांना शेअर केले आहे. ती म्हणते की, कामादरम्यान आपल्यासाठी थोडा वेळदेखील काढणे गरजेचे आहे आणि यासाठीच ती स्वत:ला फ्रेश करण्यासाठी पॅरिसला गेली होती. ट्विंकल पुढे म्हणते की, काही वेळा स्वत:साठी खर्च केल्याने आपल्यासाठी चांगले आणि फ्रेश वाटण्यासारखे असते. 
ट्विंकल नुकतीच आपल्या मैत्रिणींसोबत पॅरिसला गेली होती. या ट्रिपला तिने एका पॅरिस निवासीयांसारखा एन्जॉय केला. आपल्या अनुभवात ट्विंकलने सांगितले की, या ट्रिपचा उद्देश म्हणजे स्वत:साठी आणि आपल्या मित्रांसोबत वेळ व्यतित करणे होय. यामुळे स्वत:ला फ्रेश वाटते आणि आनंदही मिळतो.  
ट्विंकल असेही म्हणते की, बऱ्याचदा आपण वेळ घालविण्यासाठी बाहेर फिरायला जातो तर स्वत:ला दोषी समजतो. मात्र या ट्रिप दरम्यान मी स्वत:ला सर्वांपासून मुक्त होऊ इच्छित होती. ट्विंकलने या ट्रिप दरम्यान पॅरिसच्या समुद्राचा इतिहास आणि संस्कृतिचे फोटो काढले, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत भरपूर एन्जॉय केला. 
विशेष म्हणजे ज्याठिकाणी पर्यटक नास्ता करण्यासाठी जातात त्या ठिकाणी न जाता स्थानिक पॅरिसवासियांसारखे तेथील स्थानिक दुकानांवर जाऊन नास्त्याचा आस्वाद घेतला.  

Also Read : ​Beauty Tips : ​प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !

Web Title: Twinkle told Khanna to seal himself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.