पुण्यात स्वाईन फ्लूचे दोन मृत्यू
By Admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:38+5:302015-09-07T23:27:38+5:30
पुणे : पुण्यात स्वाईन फ्लूमुळे होतक असलेल्या मृत्यूंचे सत्र चालू असून आज पुन्हा दोन रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरात असणारे दमट हवामान स्वाईन फ्लू आजाराच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
प णे : पुण्यात स्वाईन फ्लूमुळे होतक असलेल्या मृत्यूंचे सत्र चालू असून आज पुन्हा दोन रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरात असणारे दमट हवामान स्वाईन फ्लू आजाराच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत या आजारामुळे पुण्यात १०७ जणांचा मृत्यू झाल्याची पालिकेकडे नोंद आहे. यामधील ४० जण हे पुणे शहरातील असून ६७ जण हे पुण्याबाहेरील म्हणजेच जिल्हा आणि पिंपरी चिंचवड भागातील असल्याचे पालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. सोमवारी स्वाईन फ्लूच्या १२३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी १५९ जणांना टॅमीफ्लू हे स्वाईन फ्लूवरील औषध देण्यात आले असून २३ जणांचे कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यामधील ७ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांपैकी २० जण हे रुग्णालयात दाखल असून १७ जण अजूनही व्हेटीलेटरवर आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना नागरीकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.