दोन जणांवर रानडुकराचा हल्ला
By admin | Published: July 17, 2016 11:31 PM2016-07-17T23:31:57+5:302016-07-17T23:31:57+5:30
जळगाव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी नागणचौकी व नशिराबाद येथे घडली. यामध्ये एका बालकाचा समावेश आहे.
Next
ज गाव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी नागणचौकी व नशिराबाद येथे घडली. यामध्ये एका बालकाचा समावेश आहे. ग्रामपंचायत कर्मचार्यावर हल्ला....जामनेर तालुक्यातील नागणचौकी येथे ग्रामपंचायत कर्मचारी असलेले लक्ष्मण भावराव सोनवणे (४२) हे रविवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतच्या विहिरीवर पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले असताना तेथे अचानक त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यामध्ये सोनवणे यांच्या छाती व नाकावर चावा घेतल्याने ते जखमी झाले. या ठिकाणी सात ते आठ रानडुक्कर होते, असे सोनवणे यांनी सांगितले. हल्ल्यातून त्यांनी कशीबशी सुटका करुन त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नशिराबादला बालकावर हल्ला....नशिराबाद येथे शेख शाहीद शेख अरीफ (६) हा बालक खेळत असताना त्याच्यावर रानडुकराने हल्ला केला. यामध्ये बालकाच्या डाव्या हाताला व पाठिला जखम झाली आहे. घटनेनंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.