टाइप २ डायबिटीस दूर ठेवण्यासाठी 'ही' गोष्ट ठरतात फायदेशीर, जाणून घ्या उपाय....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 04:42 PM2022-08-05T16:42:15+5:302022-08-05T16:43:18+5:30
Type 2 Diabetes : नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तज्ज्ञांना आढळलं की, टाइप २ डायबिटीसच्या उपचाराच्या काही दिवसांनंतर वजन कमी करून या आजाराला मात देता येऊ शकते.
Type 2 Diabetes : सध्या टाइप २ डायबिटीसचा धोका चांगलाच वाढला आहे. वयोवृद्धांसह तरूणांमध्येही टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक वाढतो आहे. अशातच तुम्हाला टाइप २ डायबिटीसला मात द्यायची असेल तर तुमच्यासाठी वजन कमी करणं फायदेशीर ठरू शकतं. जास्त लठ्ठपणामुळे टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो आणि मग यावर कंट्रोल मिळवणं कठीण होतं.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तज्ज्ञांना आढळलं की, टाइप २ डायबिटीसच्या उपचाराच्या काही दिवसांनंतर वजन कमी करून या आजाराला मात देता येऊ शकते. रिसर्चमधून समोर आले की, ज्या लोकांनी त्यांचं वजन १० टक्क्यांनी घटवलं त्यांच्यात या आजारातून बाहेर येण्याची संधी जास्त आढळली. तज्ज्ञांचं मत आहे की, लठ्ठपणा टाइप २ डायबिटीसचं मोठं कारण आहे. यावर रिसर्च करण्यासाठी ८६७ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचं वय ४० ते ६९ दरम्यानचं होतं.
टाइप २ डायबिटीस कसा होतो?
टाइप २ डायबिटीसने पीडित लोक इन्सुलिन रेजिस्टेंस नावाच्या एका स्थितीने पीडित होतात. म्हणजे त्यांच्या शरीरात इन्सुलिन तर तयार होतं, पण शरीर ग्लूकोजला पेशींमध्ये पोहोचवण्यात याचा योग्यप्रकारे वापर करू शकत नाही. यामुळे रक्तात ग्लूकोजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम असा होतो की, याच्याशी लढा देण्यासाठी पेन्क्रियाजला आणखी जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. या कारणाने पेन्क्रियाजवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे पेन्क्रियाज ब्लड ग्लूकोजचं प्रमाण सामान्य ठेवण्यसाठी इन्सुलिनचं निर्मिती करू शकत नाही.
योग्य लाइफस्टाईल फायदेशीर ठरेल
अशात टाइप २ डायबिटीसपासून बचाव करण्यासाठी गरजेचं आहे की, खाणं-पिणं व्यवस्थित असावं आणि लाइफस्टाईल चांगली असावी. यासाठी प्रत्येक ऋतूतील फळं आणि भाज्या खाव्यात. नियमितपणे वजन चेक करावं. तसेच नियमित एक्सरसाइज करावी.