'या' वयातच दिसू लागतात टाइप-२ डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 10:50 AM2019-09-20T10:50:22+5:302019-09-20T10:56:18+5:30

सध्या जगभरात टाइप २ डायबिटीस हा आजार वेगाने पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, एकट्या भारतात साधारण १० लाख लोक टाइप-२ डायबिटीसचे शिकार आहेत.

Type 2 diabetes early symptoms could be seen in childhood as young as 8 years old | 'या' वयातच दिसू लागतात टाइप-२ डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे...

'या' वयातच दिसू लागतात टाइप-२ डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे...

googlenewsNext

सध्या जगभरात टाइप २ डायबिटीस हा आजार वेगाने पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, एकट्या भारतात साधारण १० लाख लोक टाइप-२ डायबिटीसचे शिकार आहेत. सध्या भारतात डायबिटीसने पीडित २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रत्येकी ४ लोकांपैकी एकाला टाइप-२ डायबिटीस आहे. लाइफस्टाईलशी संबंधित या आजारात आपलं शरीर इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाही. ज्यामुळे शरीरात ब्लड शुगरचं प्रमाण वाढू लागतं.

कोणत्या वयात दिसतात डायबिटीसची लक्षणे

योग्यप्रकारे लक्ष दिलं तर केवळ ८ वर्षांचे असतानाच लहान मुलांमध्ये डायबिटीसची लक्षणे दिसू लागता. ज्याने हे जाणून घेता येऊ शकतं की, या लहान मुलांना मोठे झाल्यावर टाइप-२ डायबिटीस होणार की नाही. खरंतर, टाइप-२ डायबिटीसची लक्षणे हळूहळू अनेक वर्षात विकसित होतात आणि मध्यम वयात येईपर्यंत आजाराचं निदान लागतं. वैज्ञानिकांनी त्यांच्या रिसर्चच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, किती लवकर आणि कोणत्या वयात टाइप-२ डायबिटीसची लक्षणे शरीरात दिसू लागतात. 

कसा केला रिसर्च?

(Image Credit : firstaidforlife.org.uk)

यूकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चचे मुख्य जोशुआ बेल सांगतात की, 'हे फारच उल्लेखनीय आहे की, आम्हाला रक्तात अ‍ॅडल्ट डायबिटीसची लक्षणे इतक्या कमी वयात दिसत आहेत. हा कोणता क्लिनिकल अभ्यास नाही. रिसर्चमध्ये सहभागी लोकांपैकी जास्तीत जास्त डायबिटीस फ्री होते आणि काही लोकांना पुढे जाऊन डायबिटीस होणारच असं कन्फर्न झालं नव्हतं. हे जेनेटिक्सबाबत आहे जे आम्हाला सांगू शकतात की, आजार कसा डेव्हलप होतो'.

४ हजार सहभागी लोकांचं निरीक्षण

(Image Credit : diabetes.co.uk)

ब्रिस्टलमध्ये १९९० च्या सुरुवातीला एका रिसर्चमध्ये साधारण ४ हजार सहभागी लोकांना ट्रॅक करण्यात आलं होतं. या रिसर्चमध्ये तरूण आणि हेल्दी लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना डायबिटीस किंवा दुसरा कोणताही क्रॉनिक आजार नव्हता. रिसर्चमध्ये अभ्यासकांनी जेनेटिक्ससोबत एक नवीन अप्रोचला सहभागी केलं होतं, ज्याला मेटाबोलोमिक्स नाव दिलं होतं. यात रक्ताच्या सॅम्पलमधील छोट्या छोट्या अणूंची मोजणी केली. हे बघण्यासाठी की, टाइप-२ डायबिटीस होण्याचा पॅटर्न काय होता.

'या' वयातील डेटा घेतला गेला

रिसर्च दरम्यान बालपणी ८ वय असताना वयात सहभागी लोकांचा डेटा घेतला गेला, नंतर दुसऱ्यांदा १६व्या वयात आणि नंतर १८ वयात आणि त्यानंतर २५ वयात डेटा घेतला गेला. रिसर्चच्या निष्कर्षातून समोर आलं की, ८ वर्षाच्या वयात एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. तर इन्फ्लेमेट्री ग्लायकोप्रोटीन एसलाइलस आणि अमिनो अ‍ॅसिडचं प्रमाण १६ आणि १८ वयात वाढलं होतं. या मेटाबॉलिक फीचर्सला टार्गेट करून भविष्यात टाइप-२ डायबिटीस होण्याचा धोका रोखला जाऊ शकतो.

Web Title: Type 2 diabetes early symptoms could be seen in childhood as young as 8 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.