चेहऱ्यावर दिसू लागली ही लक्षणं तर वेळीच व्हा सावध, डायबिटीस असू शकतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:36 AM2022-07-02T09:36:29+5:302022-07-02T09:36:40+5:30
Diabetes Early Symptoms: ही समस्या लाइफस्टाईल आणि अनहेल्दी फूड हॅबिट्समुळे होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, गेल्या काही वर्षात आपल्या देशात डायबिटीस रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
Diabetes Early Symptoms: भारतच नाही तर जगभरातील लाखो लोक डायबिटीसचे शिकार होत आहेत. अनेक केसेसमध्ये याचं कारण जेनेटिक आहे. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये ही समस्या लाइफस्टाईल आणि अनहेल्दी फूड हॅबिट्समुळे होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, गेल्या काही वर्षात आपल्या देशात डायबिटीस रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
डायबिटीसची लक्षणं
डायबिटीस झाल्यावर शरीरावर वेगवेगळी लक्षणं दिसणं सुरू होतात. ही लक्षणं ओळखळं फार गरजेचं आहे कारण ब्लड शुगर लेव्हलमध्ये वाढ झाल्याने समस्या वाढतात. चला जाणून घेऊन आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर डायबिटीसचे वॉर्निंग साइन कशाप्रकारे दिसतात.
चेहऱ्याचा रंग बदलतो -
डायबिटीस झाल्यावर ब्लड शुगर लेव्हल वाढते अशात याचा प्रभाव चेहऱ्याच्या त्वचेवर दिसणं कॉमन आहे. जर तुम्ही लक्ष देऊन बघाल तर चेहऱ्याच्या त्वचेचा रंग थोडा पिवळा दिसू लागतो. जर हे लक्षण दिसत असेल तर याकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका.
चेहऱ्याच्या त्वचेवर ड्रायनेस -
जर तुमची त्वचा नॅच्युरल ड्राय असेल तर यामागे जेनेटिक कारण आहे. पण जर त्वचा नॉर्मल आहे आणि ऑयलीची अचानक रखरखीत होऊ लागली असेल तर समजून घ्या काहीतरी गडबड आहे. मधुमेह झाल्यावर पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. ज्यामुळे त्वचा कोरडी होते.
चेहऱ्यावर वेगवेगळ्या रंगाचे डाग
डायबिटीस झाला असेल तर त्वचेवर काळे, भुरके, लाल आणि पिवळ्या रंगाचे डाग दिसू लागतात आणि सोबतच पिंपल्सही येऊ लागतात. हाही प्री-डायबिटीस वॉर्निंग साइन आहे. जर काही होत असेल तर वेळीच चेकअप करा आणि योग्य ते उपचार घ्या.