टाईप ४ डायबिटीसबद्दल तुम्हाला माहित आहे का? लक्षणं अन् त्रास आहेत अत्यंत गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 02:58 PM2022-09-09T14:58:59+5:302022-09-09T15:02:03+5:30

काही लोकांना टाइप 3 आणि टाइप 4 मधुमेहाचा त्रास होतो. तुम्हाला टाइप 4 मधुमेहाबद्दल माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या वयोगटातील लोकांना या मधुमेहाचा त्रास होतो आणि त्याचे कारण काय आहे.

type 4 diabetes causes symptoms and remedies | टाईप ४ डायबिटीसबद्दल तुम्हाला माहित आहे का? लक्षणं अन् त्रास आहेत अत्यंत गंभीर

टाईप ४ डायबिटीसबद्दल तुम्हाला माहित आहे का? लक्षणं अन् त्रास आहेत अत्यंत गंभीर

Next

आजच्या युगात मधुमेह ही सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मधुमेहाचा शरीराच्या सर्व भागांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकार, मानसिक समस्यांसह इतरही अनेक समस्या उद्भवतात. मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत. बहुतेक लोक टाइप 2 आणि टाइप 1 मधुमेहास असुरक्षित असतात. काही लोकांना टाइप 3 आणि टाइप 4 मधुमेहाचा त्रास होतो. तुम्हाला टाइप 4 मधुमेहाबद्दल माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या वयोगटातील लोकांना या मधुमेहाचा त्रास होतो आणि त्याचे कारण काय आहे.

टाइप 4 मधुमेह म्हणजे काय?
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, टाइप 4 मधुमेह हा वृद्ध लोकांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकतेमुळे होणारा आजार आहे. हा आजार वृद्ध लोकांमध्ये होतो, ज्यांचे वजन जास्त नसते आणि ते सडपातळ असतात. टाईप 2 मधुमेहामागे लठ्ठपणा हा एक प्रमुख घटक मानला जातो, परंतु टाइप 4 मध्ये तसे नाही. याची नेमकी कारणे शोधण्याचा शास्त्रज्ञ सध्या प्रयत्न करत आहेत. वाढत्या वयामुळेही हा आजार होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. 2015 च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, टाइप 4 मधुमेह रोगप्रतिकारक पेशींच्या अतिउत्पादनामुळेदेखील होऊ शकतो. हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला.

टाइप 4 मधुमेहाची लक्षणे
टाइप 4 मधुमेहाची लक्षणे इतर प्रकारच्या मधुमेहासारखीच असतात. मात्र हे कमी वजन असलेल्या लोकांमध्ये आढळते. म्हणून अंदाज लावणे थोडे कठीण होते. त्याचीही काही लक्षणं आहेत. जी इतर आजारांसारखी दिसतात. त्यामुळे तपासणीनंतरच नेमके निदान कळू शकते. चला त्याच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया.

  • अत्यंत थकवा येणे
  • जास्त भूक आणि तहान
  • धूसर दृष्टी
  • जखम भरून न येणे, जखम बरी न होणे
  • वारंवार मूत्रविसर्जन
  • अचानक वजन कमी होणे


यावर उपचार काय?
टाईप 4 डायबिटीजवर आतापर्यंत कोणताही अचूक उपचार सापडलेला नाही. संशोधकांना आशा आहे की ते अँटीबॉडी औषध विकसित करण्यास सक्षम असतील. हे शरीरातील नियामक टी-सेल्सची संख्या कमी करण्यास आणि टाइप 4 मधुमेहावर उपचार करण्यास मदत करू शकते. जोपर्यंत हे औषध विकसित होत नाही, तोपर्यंत डॉक्टर टाइप 2 मधुमेहावरील औषधांसोबत उपचार करत आहेत.

Web Title: type 4 diabetes causes symptoms and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.