हृदयविकाराच्या झटक्याचेही असतात प्रकार! कोणता प्रकार सर्वात गंभीर? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 05:07 PM2022-08-01T17:07:04+5:302022-08-01T17:09:11+5:30

हृदयविकाराचे काही प्रकार असतात. त्याविषयीची माहिती जाणून घेऊया...

types of heart attack | हृदयविकाराच्या झटक्याचेही असतात प्रकार! कोणता प्रकार सर्वात गंभीर? घ्या जाणून

हृदयविकाराच्या झटक्याचेही असतात प्रकार! कोणता प्रकार सर्वात गंभीर? घ्या जाणून

googlenewsNext

हृदयविकाराच्या झटक्यामुळे हृदयाचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं किंवा प्रसंगी मृत्यू ओढवतो. वैद्यकीय परिभाषेत हृदयविकाराच्या झटक्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन (Myocardial Infarction) असं म्हणतात. यामुळे हृदयाच्या स्नायूंना गंभीर इजा होते. रक्ताच्या गुठळ्या झाल्यानं कोरोनरी धमन्या काही अंशी किंवा पूर्णपणे ब्लॉक होतात, तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता साधारणपणे झटका आल्यावर हृदयाच्या किती स्नायूंना दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. हृदयातल्या एखाद्या भागाला होणाऱ्या रक्तप्रवाहात रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळे निर्माण होतात, तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीज चरबी, कोलेस्टेरॉल किंवा अन्य पदार्थांमुळे घट्ट होतात. याला प्लाक असंही म्हणतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

हृदयविकाराच्या झटका येण्यापूर्वी काही लक्षणं दिसू लागतात. संबंधित रुग्णाच्या शरीराचा वरचा भाग म्हणजेच हात, मान, खांदे किंवा जबडा दुखू लागतो. काही रुग्णांना धडधडतं, चक्कर येते, श्वास घेण्यास त्रास होतो, घाम येतो आणि मळमळ होऊ लागते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी थकवा किंवा मळमळ जाणवू लागते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये झटक्याची लक्षणं अतिशय सौम्य आणि सायलेंट असतात. हृदयविकाराचे काही प्रकार असतात. त्याविषयीची माहिती जाणून घेऊया...

हृदयविकाराच्या झटक्याचे प्रामुख्यानं तीन प्रकार आहेत. त्यात एसटी सेगमेंट एलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन, नॉन एसटी सेगमेंट इलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन, कोरोनरी स्पाझम किंवा अनस्टेबल अंजायना यांचा समावेश होतो.

एसटी सेगमेंट एलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन (STEMI) : एसटी सेगमेंट एलेव्हेशन मायोकार्डिअल इन्फार्क्शन हा हृदयविकाराचा गंभीर प्रकार आहे. या प्रकारात कोरोनरी आर्टरी पूर्णतः ब्लॉक होते आणि त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. एसटी सेगमेंट एलेव्हेशन म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्रामवर दिसणारा पॅटर्न. या प्रकारचा हृदयविकाराचा झटका आल्यास संबंधित रुग्णाला तात्काळ आणि आपत्कालीन रिव्हॅस्क्युलरायझेशनची गरज असते. यामुळे धमनीमधून रक्त प्रवाह पुन्हा सुरू होतो. रिव्हॅस्क्युलरायझेशन थ्रॉम्बोलाइटिक्सच्या (क्लॉट बस्टर्स) औषधांद्वारे केलं जातं. यात इंट्राव्हेन्सद्वारे शरीरात औषधं सोडली जातात. तसंच अँजिओप्लास्टी करून कॅथेटर धमन्यांमध्ये टाकला जातो. `एसटीईएमआय`मध्ये रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी वेदना होतात. काही रुग्णांना दोन्ही हातांना, पाठीत किंवा जबड्यामध्ये वेदना होतात. याशिवाय या प्रकारचा हृदयविकाराचा झटका आल्यास मळमळ, श्वास घेण्यास त्रास होणं, भीती वाटणं, डोकं हलकं वाटणं, शरीर थंड पडल्यासारखं वाटणं ही लक्षणं दिसून येतात. अशी लक्षणं दिसून आल्यास तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे.

नॉन एसटी सेगमेंट एलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन (NSTEMI) : हृदयविकाराच्या झटक्याच्या एनएसटीएमआय या प्रकारात कोरोनरी आर्टरी अंशतः प्रभावित होते. ही स्थिती एसटीएमआयच्या तुलनेत कमी धोकायदायक असते. एनएसटीएमआयमध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्रामवर एसटी सेगमेंट एलेव्हशनमध्ये बदल झाल्याचं दिसून येत नाही. या प्रकारात हृदयाचं कमी प्रमाणात नुकसान होतं. कोरोनरी अॅंजिओग्राफीत आर्टरी किती प्रमाणात ब्लॉक झाली आहे. हे दिसून येतं. तसंच संबंधित रुग्णाची रक्त तपासणी केली असता त्यात ट्रोपोनिन या प्रोटीनची पातळी वाढल्याचं दिसून येतं. या प्रकारात हृदयाचं कमी प्रमाणात नुकसान होत असलं, तरी ही एक प्रकारची गंभीर स्थिती मानली जाते.

कोरोनरी स्पाझम किंवा अनस्टेबल अंजायना : कोरोनरी आर्टरी स्पाझम किंवा कोरोनरी स्पाझम हा हृदयविकाराच्या झटक्याचा एक प्रकार असतो. याला अनस्टेबल अंजायना किंवा सायलेंट हार्ट अॅटॅक (Silent Heart Attack) असंही संबोधलं जातं. या प्रकारात एसटी सेगमेंट एलेव्हेशनप्रमाणेच लक्षणं दिसून येतात. स्नायू दुखणं, अपचन आदी प्रकारचा त्रास रुग्णाला जाणवतो. जेव्हा हृदयाची एक आर्टरी इतकी घट्ट होते की त्यातला रक्तप्रवाह थांबतो किंवा लक्षणीय प्रमाणात कमी होतो. इमेजिंग किंवा रक्त तपासणीतूनच याचं निदान होतं. या प्रकारामुळे हृदयाचं कायमस्वरूपी नुकसान होत नाही. हृदयविकाराचा हा सौम्य झटका फारसा गंभीर नसला तरी त्यामुळे पुन्हा झटका येण्याची आणि रुग्णाची स्थिती गंभीर होण्याची शक्यता असते.

अनेक रुग्णालयं किंवा वैद्यकीय केंद्रांमध्ये हृदयविकाराशी निगडित निदान आणि उपचारांसाठी पुरेशी व्यवस्था असतेच असं नाही; मात्र गुरुग्राममधलं मॅक्स हॉस्पिटल सर्व उपकरणांनी सुसज्ज आहे. तेथे हृदयविकाराच्या रुग्णांवर आधुनिक तंत्राच्या साह्याने उपचार केले जातात

Web Title: types of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.