दाताच्या दुखण्यामुळे झालं ब्रेन इन्फेक्शन, दुर्लक्ष करणं पडलं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 01:11 PM2020-07-29T13:11:46+5:302020-07-29T13:15:31+5:30
ही बातमी वाचून तुम्ही हैराण तर व्हाल सोबतच पुढे आयुष्यात कधीही तुम्ही दाताच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. ४ मुलांची आई असलेल्या एका महिलेने असंच दात दुखण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं नंतर जे समोर आलं त्याची तिने कल्पनाही केली नव्हती.
मेडिकल विश्वातून नेहमीच वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येत असतात. अशीच एक दाताच्या दुखण्यासंबंधी दुर्मिळ घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण तर व्हाल सोबतच पुढे आयुष्यात कधीही तुम्ही दाताच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. ४ मुलांची आई असलेल्या एका महिलेने असंच दात दुखण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं नंतर जे समोर आलं त्याची तिने कल्पनाही केली नव्हती.
Rebecca Dalton ही यूकेची राहणारी आहे. गेल्या ५ महिन्यांपासून ती हॉस्पिटलमध्ये आहे. कारण तिने दाताच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. नंतर तिला समजलं की, याच कारणाने तिच्या ब्रेनला इन्फेक्शन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांनी सांगितले की, दात दुखताना काही बॅक्टेरिया तिच्या ब्रेन इन्फेक्शनचं कारण बनले.
इतकेच नाही तर या बॅक्टेरियाने तिच्या लिव्हर आणि हार्टलाही प्रभावित केलं. मार्च महिन्यात तिने डेंटिस्टला दाखवले होते. पण तेव्हा याबाबत काहीही कल्पना नव्हती. पण हळूहळू इन्फेक्शन वाढू लागलं. इतकंच नाही तर याच्या प्रभावामुळे चालूही शकत नव्हती. नंतर तिला न्यूरोलॉजी विभाग Hull Royal Infirmary मध्ये नेण्यात आलं.
रेबेकाला हॉस्पिटलच्या ज्या भागात ठेवण्यात आले होते तिथे कोरोना रूग्णांना आणलं जात होतं. इतकेच नाही तर या गोष्टीमुळे रेबेकाची १२ वेळा कोरोना टेस्टही केली गेली. सुदैवाने ती निगेटिव्ह आली. जर तिला कोरोना झाला असता तर तिचं वाचणं अवघड झालं असतं कारण ती आधीच एका इन्फेक्शनने पीडित होती.
तिने सांगितले की, 'तिच्यासाठी हा अनुभव जीवन बदलणारा होता. ३५ वयात कोण हा विचार करतं की, रोज उठून गोळ्या खाव्या. फार कठिण काळ होता. याने मला जगण्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळाला'. सध्या ती घरीच रिहॅबिलिटेशनमध्ये आहे.
हे पण वाचा :
काय सांगता! मनुष्यांचं रक्त का पितात डास? कारण समजल्यावर हैराण झाले वैज्ञानिक!