ना गोळ्या, ना इंजेक्शन! डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आला नवा उपचार, रुग्णांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:10 PM2022-04-08T17:10:56+5:302022-04-08T17:13:31+5:30

अमेरिकेतील संशोधकांनी या प्रकारच्या मधुमेहावर एक नवी उपचार पद्धती (Diabetes treatment) शोधली आहे. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारच्या गोळ्या-औषधे किंवा इंजेक्शनची गरज भासत नाही.

ultrasound technique for diabetes cure | ना गोळ्या, ना इंजेक्शन! डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आला नवा उपचार, रुग्णांना दिलासा

ना गोळ्या, ना इंजेक्शन! डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आला नवा उपचार, रुग्णांना दिलासा

googlenewsNext

मधुमेह (Diabetes) या दुर्धर आजाराची लागण झाली, की माणसाला आयुष्यभरासाठी गोळ्या आणि इंजेक्शनची गरज भासते. कारण या आजारावर अद्याप रामबाण इलाज (Diabetes cure) उपलब्ध नाही. अशात टाईप-2 डायबेटिस (Type 2 diabetes) असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील संशोधकांनी या प्रकारच्या मधुमेहावर एक नवी उपचार पद्धती (Diabetes treatment) शोधली आहे. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारच्या गोळ्या-औषधे किंवा इंजेक्शनची गरज भासत नाही.

अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार
अमेरिकेतील जीई रिसर्चच्या (GE research diabetes) एका पथकाने ही नवी उपचार पद्धती शोधली आहे. या पथकामध्ये येल स्कूल ऑफ मेडिसीन आणि फेंस्टीन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांचा समावेश आहे. डायबेटिक व्यक्तीच्या लिव्हरवर अल्ट्रासाउंड किरणांचा (Ultrasound rays) मारा करून, शरीरातील इन्शुलिन (Insulin) आणि ग्लुकोजचा स्तर कमी करणं, अशी ही एकूण प्रक्रिया आहे. नेचर (Nature magazine) या विज्ञानविषयक मॅगझिनमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या उपचार पद्धतीला पेरिफेरल फोकस्ड अल्ट्रासाउंड स्टिम्युलेशन (pFUS) असं नाव देण्यात आले आहे.

कशी आहे प्रक्रिया
संशोधकांनी सांगितलं, की यकृतामध्ये पोर्टा हेपॅटिस (Porta Hepatis) नावाच्या भागात पाठीपासून येणाऱ्या मज्जातंतूंचं जाळं असतं. हे मज्जातंतूच मेंदूला शरीरातील ग्लुकोज आणि इतर पोषकतत्त्वं किती प्रमाणात आहेत हे सांगत असतात. हे मज्जातंतू आकाराने अगदीच लहान असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड असतं. मात्र, अल्ट्रासाउंड किरणांच्या मदतीने (Diabetes treatment with ultrasound) या मज्जातंतूंना संदेश पोहोचवणं सोपं होतं. या प्रयोगावेळी आम्ही यकृताच्या (Liver) पोर्टा हेपॅटिस भागात pFUS अल्ट्रासाउंड किरणं सोडली. या माध्यमातून हाय ब्लड शुगर पुन्हा नॉर्मल करण्यात आम्हाला यश मिळालं.

अद्याप मानवी चाचणी बाकी

नेचर मॅगझिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अद्याप केवळ उंदीर आणि डुक्कर या प्राण्यांवर या उपचार पद्धतीची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. केवळ तीन मिनिटं अल्ट्रासाउंडचा (Ultrasound for diabetes treatment) मारा करून संशोधकांना या प्राण्यांमधील साखरेचा स्तर पूर्णपणे सामान्य करण्यात यश मिळालं. त्यामुळे आता याची माणसांवर चाचणी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

तीन मिनिटांत शुगर होणार नॉर्मल
या उपचार पद्धतीची मानवी चाचणी यशस्वी ठरली तर तो एक मैलाचा दगड ठरणार आहे. भविष्यात आपण अल्ट्रासाउंडचा मारा करणारी छोटी उपकरणं तयार करू शकतो, जी रुग्णांना आपल्या घरी वापरता येतील. या उपकरणांच्या मदतीने दररोज काही मिनिटांमध्येच लोक आपली ब्लड शुगर नियंत्रणात आणू शकतील. यामुळे गोळ्या-औषधं किंवा इन्शुलिनच्या इंजेक्शनचा त्रास इतिहासजमा होईल.

डायबेटिसवरील ही उपचार पद्धती अंमलात आल्यास जगभरातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. हे टेक्निक डायबेटिसच्या उपचारांमध्ये नक्कीच गेमचेंजर ठरणार आहे.

Web Title: ultrasound technique for diabetes cure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.