अरे बापरे! ९.४ मिलियन लोकांना एचआयव्ही झाल्याची कल्पनाच नाही - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 10:35 AM2018-11-29T10:35:09+5:302018-11-29T10:35:22+5:30

वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) १ डिसेंबरला जगभरात पाळला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरातील लोकांमध्ये एचआयव्ही इन्फेक्शनबाबत जागरुकता निर्माण करणे आहे.

UNAIDS Report Says 9.4 Million People Don’t Know They Are HIV Positive! | अरे बापरे! ९.४ मिलियन लोकांना एचआयव्ही झाल्याची कल्पनाच नाही - रिपोर्ट

अरे बापरे! ९.४ मिलियन लोकांना एचआयव्ही झाल्याची कल्पनाच नाही - रिपोर्ट

googlenewsNext

वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) १ डिसेंबरला जगभरात पाळला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरातील लोकांमध्ये एचआयव्ही इन्फेक्शनबाबत जागरुकता निर्माण करणे आहे. २०१८ मध्ये एड्स दिवसाची थीम “Know your status” ही आहे. याचा अर्थ आपल्या एचआयव्ही स्टेटसची माहिती असायला हवी. अशातच एका रिपोर्टनुसार, एचआयव्ही संक्रमणाबाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. आपल्याला एचआयव्ही झाल्याचं माहीत नसलेल्या लोकांची एक अंदाजे आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

'नॉलेज इज पॉवर' या एका नव्या रिपोर्टनुसार धक्कादायक खुसाला करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार जगभरातील अंदाजे ९.४ मिनियन लोक असे आहेत. ज्यांना ते एचआयव्ही व्हायरसने संक्रमित असल्याची त्यांना कल्पना सुद्धा नाहीये. याचा अर्थ अजूनही लोक एचआयव्ही टेस्ट करण्यास घाबरतात. यूएनएड्स व्दारे जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, एचआयव्हीने ग्रस्त केवळ २७ मिलियन लोक म्हणजेच ७५ टक्के लोकांनाच हे माहीत आहे की, ते एचआयव्हीने ग्रस्त आहेत. 

या रिपोर्टचा उद्देश एचआयव्हीने ग्रस्त ९.४ मिनियन लोकांमध्ये जागरूकता रुजवण्याचं आहे. एचआयव्ही ग्रस्त लोकांना ही माहिती देणं आहे की, त्यांना या गंभीर आजाराने जाळ्यात घेतलंय आणि त्यांना हा आजार रोखण्याचे उपाय माहीत नाहीत. रिपोर्टमध्ये याही गोष्टीचा खुसाला करण्यात आला आहे की, आधीच्या तुलनेत आता एचआयव्हीबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. मात्र लोकांमध्ये अजूनही याबाबत फार जास्त भिती आहे. 

यूएनएड्सचे कार्यकारी निर्देशक, मिशेल सिडीबे यांच्यानुसार, वायरल लोडचं निरीक्षण करण्यासाठी एचआयव्हीने पीडित लोकांना दर १२ महिन्यांनी वायरल लोड परीक्षण करण्याची गरज आहे. 

काय आहे वायरल लोड परीक्षण?

वायरल लोड परीक्षण ही एचआयव्ही उपचारावर लक्ष ठेवली जाणारी एक प्रक्रिया आहे. यातून हे दिसतं की, उपचार काम करत आहेत का? लोकांचं वय वाढलं आणि ते चांगलं जीवन जगत आहेत का? सोबतच वायरसला नियंत्रणात ठेवलं जात आहे की नाही. रिपोर्टमध्ये उल्लेख केला गेला आहे की, वायरल लोड परीक्षण करण्याची सुविधा जगाच्या काही भागात करणे सोपं आहे. 

महिला, पुरुष, तरुणांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, एचआयव्ही सेवांपर्यंत पोहोचण्यास लोकांमध्ये भीती आहे. त्यांनी भीती असते की, त्यांना झालेल्या या आजाराबाबत त्यांच्या परिवाराला, मित्रांना कळेल. या भीतीमुळे जास्तीत जास्त लोक हे एचआयव्ही परीक्षण आणि उपचारापासून दूर राहतात. 

यूएनएड्सनुसार, एचआयव्ही परीक्षणांपर्यंत पोहोचणे हा मानवी अधिकार आहे. संयुक्त राष्ट्र एचआयव्ही/ए्डस एजन्सींनीही एचआयव्ही रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. एचआयव्हीसंबंधी भेदभाव किंवा वाईट वागणूक संपवणे, एचआयव्ही परीक्षण आणि उपचार सेवांमध्ये गोपनियता सुनिश्चित करणे तसेच जास्तीत जास्ती लोकांमध्ये जागरूकता वाढवणे ही प्राथमिकता आहे.  

अशात लोकांनी अधिक जागरुक होऊन एचआयव्ही तपासणी करायला हवी. तेव्हाच या रोगाचं निदान लागून योग्य ते उपचार घेतले जाऊ शकतात. जेणेकरुन एचआयव्ही ग्रस्त लोकांनाही चांगलं जीवन जगता यावं. 

Web Title: UNAIDS Report Says 9.4 Million People Don’t Know They Are HIV Positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.