हा तर चमत्कारच... आईच्या गर्भातच झाली बाळाची सर्जरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:18 PM2019-02-14T15:18:31+5:302019-02-14T15:19:18+5:30

सध्या विज्ञानाच्या जोरावर माणूस अगदी मंगळावरही घर बांधण्याच्या तयारीत आहे.  परंतु अजुनही काही गोष्टी आहेत ज्याबाबत विज्ञान आणि माणूस काही करू शकत नाही.

This unborn baby undergoes spina bifida treatment in moms womb | हा तर चमत्कारच... आईच्या गर्भातच झाली बाळाची सर्जरी!

हा तर चमत्कारच... आईच्या गर्भातच झाली बाळाची सर्जरी!

Next

सध्या विज्ञानाच्या जोरावर माणूस अगदी मंगळावरही घर बांधण्याच्या तयारीत आहे.  परंतु अजुनही काही गोष्टी आहेत ज्याबाबत विज्ञान आणि माणूस काही करू शकत नाही. पण काही दिवसांपूर्वी यूकेमध्ये झालेल्या एका यशस्वी सर्जरीनंतर माणूस लवकरच विज्ञानाच्या मदतीने आणि आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर लवकरच सर्व विश्व आपल्या हातात घेईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

काही दिवसांपूर्वी यूनाइटेड किंगडममध्ये याआधी कधीही न करण्यात आलेली सर्जरी करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. डॉक्टरांच्या या कामगिरीवर संपूर्ण जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डॉक्टरांनी एका महिलेच्या गर्भात असणाऱ्या अर्भकाच्या स्पाइनची सर्जरी केली आहे. ऐकून गोंधळलात ना?, कसं शक्य आहे?, खरचं का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतीलच. पण तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. यूकेमधील एसेक्स येथे राहणाऱ्या 26 वर्षीय बेथन सिंपसन या महिलेला डॉक्टरांनी 20 आठवड्यांच्या स्कॅन नंतर सांगितले की, तिच्या गर्भामध्ये असलेल्या स्त्री अर्भकाला spina bifida आहे. हा एक प्रकारचा बर्थ डिफेक्ट म्हणजे, जन्म दोष आहे. ज्यामध्ये आईच्या गर्भामध्ये असलेल्या अर्भकाची स्पाइनल कॉर्डची व्यवस्थित वाढ होत नाही. 

spina bifida म्हणजे काय? 

spina bifida एक असा बर्थ डिफेक्ट आहे, ज्यामध्ये गर्भामध्ये वाढणाऱ्या अर्भकाच्या स्पाइन आणि स्पाइनल कॉर्डचा विकास होत नाही. यामुळे स्पाइन म्हणजेच मणक्याच्या हाडामध्ये गॅप तयार होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, असं नक्की का होतं? याबाबत अद्याप ठोस कारण समजू शकलं नाही. परंतु गरोदरपणाच्या सुरूवातीच्या काळामध्ये फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे अशा प्रकरची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. याव्यतिरिक्त गरोदरपणात घेण्यात येणाऱ्या औषधांमुळे किंवा अनुवंशिक कारणामुळेही spina bifidaची समस्या निर्माण होते. 

यूकेमध्ये सिंपसन अशी चौथी महिला आहे, जिची 'foetal repair'ची सर्जरी झाली आहे. 4 तास सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये सिंपसनचा गर्भ खोलून अर्भकाच्या शरीराच्या खालच्या भागामध्ये असणाऱ्या स्पाइनमध्ये एक छोटं छिद्र केलं. पहिल्यांदा डॉक्टरांनी कॉम्प्लिकेशन्स पाहून सिंपसनला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला होता. परंतु सिंपसनचं असं म्हणणं होतं की, 'मी असा विचारही करू शकत नाही, मला माझ्या गर्भामध्ये बाळाचं अस्तित्व जाणवत आहे.' अशाप्रकार डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आणि ऑपरेशन यशस्वी झालं. सिंपसन आपल्या बाळाला एप्रिल 2019मध्ये जन्म देणार आहे. 

सिपंसनने सांगितलं की, जेव्हा माझ्या गर्भामध्ये वढणाऱ्या बाळाला असणाऱ्या समस्येबाबत समजलं आणि माझ्या पतिला अबॉर्शन करणं हाच योग्य पर्याय असून अर्भकाची सर्जरी करणं फार कठिण असल्याचे सांगितले. कदाचित गर्भामध्ये वाढणारं बाळ पॅरालाइज्डही असू शकतं. परंतु सिपंसन सर्जरीच्या पर्यायावर अडून राहिली आणि डिसेंबरमध्ये तिने सर्जरी अप्रूव्ह केली. गरोदरपणाच्या 24व्या आठवड्यात सर्जरी करण्यात आली. एवढचं नाही तर अर्भकालाही योग्य पद्धतीने ठेवण्यात आलं असून सर्जरी यशस्वी करण्यात आली. 

Web Title: This unborn baby undergoes spina bifida treatment in moms womb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.