तुम्ही काय खाता यापेक्षा कसं खाता यावर अवलंबून आहे तुमच्या आतड्यांच आरोग्य, जाणून घ्या योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 03:31 PM2021-10-13T15:31:12+5:302021-10-13T15:31:36+5:30

लोकांना असे वाटते की आतड्यांचे आरोग्य केवळ आपण खाल्लेल्या पदार्थांशी संबंधित आहे. परंतु, आपल्याला हे माहीत असले पाहिजे की, आपण खाण्याची पद्धत देखील त्यासाठी खूप महत्वाची आहे.

understand importance of how to eat properly for gut or intestine health | तुम्ही काय खाता यापेक्षा कसं खाता यावर अवलंबून आहे तुमच्या आतड्यांच आरोग्य, जाणून घ्या योग्य पद्धत

तुम्ही काय खाता यापेक्षा कसं खाता यावर अवलंबून आहे तुमच्या आतड्यांच आरोग्य, जाणून घ्या योग्य पद्धत

Next

चांगल्या आरोग्यासाठी काय खावे, काय खाऊ नये याबाबत माहिती दिला जाते. मात्र  पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला जेवण कसे खावे हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. यूके न्यूज वेबसाइट मेट्रोवरील एका लेखात, पोषण तज्ज्ञ क्लेरिसा लेनहर असे म्हणतात, लोकांना असे वाटते की आतड्यांचे आरोग्य केवळ आपण खाल्लेल्या पदार्थांशी संबंधित आहे. परंतु, आपल्याला हे माहीत असले पाहिजे की, आपण खाण्याची पद्धत देखील त्यासाठी खूप महत्वाची आहे.

क्लेरिसा लेनहार म्हणतात, 'अनेकांना चालता-चालता अन्न खाण्याची सवय लागली आहे, पण अशा सवयींमुळे अपचन आणि आतड्यांना सूज येणे, अशा समस्या उद्भवू ॉशकतात. जेव्हा पचनाशी संबंधित समस्या येतात तेव्हा विचार न करता खाणे हे सर्वात मोठे घातक बनते. त्या म्हणतात, 'जेव्हा आपली पचनसंस्था प्रभावीपणे काम करत असते, तेव्हा आपण आपले अन्न सहज पचवू शकतो आणि खाण्यातून अधिक पोषक तत्त्वे घेऊ शकतो आणि आतड्यांचे चांगले आरोग्य मिळवू शकतो.' आपण खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करून आतड्यांची कार्यक्षमता कशी सुधारता येईल याबाबत माहिती घेऊया.

अन्न नीट चावून खा
क्लेरिसा म्हणतात की, पचन यंत्रणा आपल्या तोंडातून सुरू होते. जेव्हा आपण अन्न पदार्थ व्यवस्थित चघळता, तेव्हा आपण लाळ सोडतो, ज्यात पाचक एंजाइम असतात, जे खाल्लेले अन्न पचवण्यास मदत करतात. ही प्रक्रिया नीट न झाल्यास आतड्याला सूज येणे आणि अपचन होऊ शकते. अन्न तोंडात पूर्ण बारीक होईपर्यंत ते चावले पाहिजे. 

चालता-चालता खाणे टाळा
चालता-चालता खाल्ल्याने जास्त खाणे, अपचन आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आपण हालचाल करत असतो, तेव्हा आपले शरीर एका वेगळ्या सिम्पेथेटिक अवस्थेत (sympathetic state) असते. त्यावेळी खाणे योग्य नसते. म्हणून, जेव्हा आपण आपल्या पॅरासिम्पेथेटिक (parasympathetic state) अवस्थेत असतो तेव्हा आपण खाल्ले पाहिजे. विश्रांती घेऊन आरामात खाल्ले पाहिजे.

नियमित जेवणाची वेळ
जर आपण आपला नियमित आहार योग्य वेळी घेतला तर आपण स्नॅक्स खाणे टाळतो. यामुळे आपण स्नॅकिंग माइग्रेटिंग मोटर कॉम्प्लेक्स (MMC) ला प्रोत्साहन देते. जे आतडे स्वच्छ करण्यात आणि आपल्या आतड्यांच्या हालचाली नियमित ठेवण्यास मदत करते. नियमित जेवण्याची सवय ठेवा, प्रत्येक जेवणामध्ये तीन ते चार तासांचे अंतर ठेवण्याचे ध्येय ठेवा.

तणावाखाली खाणे टाळा
जर तुम्हाला जेवणाच्या वेळी तणाव वाटत असेल तर खाण्यापूर्वी काही खोल श्वास घ्या. खोल श्वासोच्छ्वासामुळे व्हॅगस नर्व शांत होऊ शकतो, जे आतडे आणि मेंदू यांच्यातील अनेक सिग्नल नियंत्रित करते.

खाताना जेवणाकडेच लक्ष द्या
जेव्हा आपण जेवायला सुरू करतो, तेव्हा आपला मेंदू त्याची नोंद घेतो आणि पचन प्रक्रियेला गती देतो. म्हणून जेव्हा आपण खाताना खाण्यापेक्षा इतर गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्याचा मेंदूच्या स्थितीवर परिणाम होतो. यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होण्यासारखे अनेक नुकसान होऊ शकते. म्हणून जेवताना टीव्ही बंद ठेवा, तुमचा फोन दूर ठेवा आणि तुमच्या ताटात आलेले अन्न आनंदाने खा, त्याचा आदर करा.

हळूहळू खा
आता पोट भरले आहे, याचा मेंदूला सिग्नल पाठवण्यासाठी १० ते २० मिनिटे लागू शकतात. जर आपण हळू हळू खात असाल तर आपण हे सिग्नल गमावू शकतो आणि जास्त खाणे टाळू शकतो. तुम्ही कुठेही जेवण खाण्यासाठी १० ते २० मिनिटांचा वेळ आदर्श मानला जातो

Web Title: understand importance of how to eat properly for gut or intestine health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.