किचनमधून लगेच बाहेर करा हे तेल, घातक कोलेस्ट्रॉल कधीच सोडणार नाही पिच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:24 PM2022-12-13T13:24:35+5:302022-12-13T13:24:55+5:30

Cooking Oil Side Effects: असे तेल किचनमधून बाहेर केले पाहिजे. जर या तेलांनी जेवण तयार केलं तर तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. चला जाणून घेऊ कोणतं तेल आहे नुकसानकारक....

Unhealthy cooking oil that increases cholesterol and fat | किचनमधून लगेच बाहेर करा हे तेल, घातक कोलेस्ट्रॉल कधीच सोडणार नाही पिच्छा

किचनमधून लगेच बाहेर करा हे तेल, घातक कोलेस्ट्रॉल कधीच सोडणार नाही पिच्छा

Next

Cooking Oil Side Effects: तेलाशिवाय जेवण तयार करणं अवघड काम आहे. यात फॅट असतं, जे कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतं. कोलेस्ट्रॉल आणि फॅट शरीरासाठी आवश्यक आहेच, पण काही तेलांमुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खराब तेल खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, बीपी, लठ्ठपणा आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका राहतो. असे तेल किचनमधून बाहेर केले पाहिजे. जर या तेलांनी जेवण तयार केलं तर तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. चला जाणून घेऊ कोणतं तेल आहे नुकसानकारक....

रिफाइंड ऑइल नुकसानकारक

आपण लोक मोठ्या आवडीने रिफाइंड तेलाचं सेवन करतो.  पण रिफाइंड तेल खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हे तेल प्रोसेस्ड असतं. यात अनेक रसायनांचं वापर केला जातो. भलेही रिफाइंड तेल कोणत्याही बियांचं असेल, आरोग्यासाठी नकसानकारक असतं.

आजारांचा असतो धोका

रिफाइंड ऑइल खाल्ल्याने कॅन्सर, डायबिटीस आणि एथेरोस्क्लेरोसिस सारखा आजार होण्याचा धोका राहतो. रिफाइंड ऑइलमुळे वजनही वाढतं. जर समस्यांपासून बचाव करायचा असेल तर रिफाइंड ऑइल खाणं बंद करावं.

पोषणाची कमी

रिफाइंड ऑइल खाल्ल्याने तेलातून मिळणालं पोषण दूर होतं. याने आरोग्याचं नुकसान होतं. यात ट्रांस फॅटचं प्रमाण वाढतं. जे  शुगर वाढवण्याचं काम करतं. रिफाइंड ऑइल गुड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं कामही करतं. 

कसं तेल खावं? 

रिफाइंड ऑइलऐवजी कोल्ड प्रेस तेल खाणं फायदेशीर असतं. मोहरी, शेंगदाणे आणि तिळाचं कोल्ड प्रेस तेल आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तूप आणि खोबऱ्याचं तेलही जेवण तयार करण्यासाठी फायदेशीर असतं. यात ओमेगा 3 फॅटी अॅसिडही मिळतं जे हृदयासाठी चांगलं असतं.

Web Title: Unhealthy cooking oil that increases cholesterol and fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.