CoronaVirus News : नवीन वर्षात देशात कोरोनाची लस उपलब्ध होणार, संसदेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 03:00 PM2020-09-17T15:00:52+5:302020-09-17T15:01:42+5:30

सुरुवातीला फक्त एक चाचणी प्रयोगशाळेची सुविधा होती. परंतु आता ती 1700पर्यंत वाढविण्यात आली आहे.

union health minister harsh vardhan asked in parliament vaccine may available on new year | CoronaVirus News : नवीन वर्षात देशात कोरोनाची लस उपलब्ध होणार, संसदेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

CoronaVirus News : नवीन वर्षात देशात कोरोनाची लस उपलब्ध होणार, संसदेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

Next

भारतात नवीन लसींसाठी चाचण्या फेज 1, फेज 2 आणि फेज 3मध्ये पोहोचल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. ते संसदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञांचा गट याचा अभ्यास करीत आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस ही लस भारतात उपलब्ध व्हावी, त्यासाठी आम्ही डब्ल्यूएचओबरोबर समन्वय साधत आहोत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या टप्प्यांची माहिती देताना ते म्हणाले की, सुरुवातीला फक्त एक चाचणी प्रयोगशाळेची सुविधा होती. परंतु आता ती 1700पर्यंत वाढविण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री म्हणाले, आज देशात 110 कंपन्या पीपीई किट बनवतात. देशात व्हेंटिलेटर उत्पादकांची संख्याही 25 झाली आहे. एन 95 मास्कचे 10 मोठे उत्पादक देखील आहेत. यापूर्वी आम्हाला व्हेंटिलेटरच्या आयातीवर अवलंबून राहावे लागायचे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने कधीही राज्यांमध्ये भेदभाव केलेला नाही.

त्यांनी कबूल केले की, या लॉकडाऊनमुळे काही काळ प्रवासी कामगारांची गैरसोय झाली होती, परंतु केंद्रीय गृह मंत्रालयाने जवळपास 64 लाख स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी ट्रेनमधून नेण्यासाठी वेळेवर पाऊल उचलली. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, कोरोनाचा मृत्यूदर संपूर्ण जगात सर्वात कमी आहे.

जेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री लोकसभेत कोरोना संसर्ग आणि त्याच्याशी निपटण्यासाठीच्या यंत्रणेविषयी बोलत होते, तेव्हा त्यांचा आवाज माइकवरून येण्याचा थांबला. यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी पुढाकार घेतला आणि ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात आली. जेव्हा हर्षवर्धन पुन्हा बोलू लागले, तेव्हा त्यांनी माइक बंद आहे की सुरू हे माहीत नसल्याचं सांगितलं. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
 

Web Title: union health minister harsh vardhan asked in parliament vaccine may available on new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.