Unique Digital Health ID : युनिक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड बनवा, तुम्हाला मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या प्रक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 02:20 PM2021-12-19T14:20:05+5:302021-12-19T14:21:01+5:30
Unique Digital Health ID : या युनिक कार्डवरून कोणावर कुठे उपचार झाले, हे कळणार आहे. तसेच व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक माहितीची नोंद या युनिक हेल्थ कार्डमध्ये केली जाईल.
नवी दिल्ली : आता आधारप्रमाणे हेल्थ कार्डही दिले जाणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड (Unique Health Card) बनवणार आहे. हे पूर्णपणे डिजिटल कार्ड असेल, जे अगदी आधार कार्डसारखे. आधार कार्डप्रमाणेच तुम्हाला त्यावर एक क्रमांक मिळेल, जो आरोग्य क्षेत्रात व्यक्तीची ओळख होईल. या कार्डच्या मदतीने डॉक्टरांना तुमचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड समजेल.
या युनिक कार्डवरून कोणावर कुठे उपचार झाले, हे कळणार आहे. तसेच व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक माहितीची नोंद या युनिक हेल्थ कार्डमध्ये केली जाईल. यामुळे रुग्णाला सर्वत्र फाईल सोबत घेऊन जावे लागणार नाही. डॉक्टर किंवा हॉस्पिटलला रुग्णाचा युनिक हेल्थ आयडी पाहून त्याची प्रकृती कळू शकेल आणि त्यानंतर त्याच्या आधारे पुढील उपचार सुरू करता येतील.
या कार्डामुळे व्यक्तीला सरकारी योजनांचीही माहिती मिळेल. रुग्णाला आयुष्मान भारत अंतर्गत उपचार सुविधांचा लाभ मिळतो की नाही, हे या युनिक कार्डद्वारे समजणार आहे. आधार कार्डाप्रमाणेच युनिक हेल्थ आयडी अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचा आरोग्याशी संबंधित डेटाबेस तयार करेल. या आयडीसह, सर्व माहिती त्या व्यक्तीच्या वैद्यकीय रेकॉर्डमध्ये ठेवली जाईल.
या आयडीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण वैद्यकीय रेकॉर्ड पाहता येते. जर ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली तर ती व्यक्ती त्याचा हेल्थ आयडी दाखवू शकते. याआधी कोणते उपचार केले गेले, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि कोणती औषधे यापूर्वी दिली गेली हे कळेल. या सुविधेद्वारे सरकार लोकांना उपचार इत्यादींमध्येही मदत करू शकणार आहे.
यामध्ये त्या व्यक्तीचा आयडी तयार केला जाईल, त्याच्याकडून मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक घेतला जाईल. या दोन रेकॉर्डच्या मदतीने युनिक हेल्थ कार्ड तयार केले जाणार आहे. यासाठी सरकार एक आरोग्य प्राधिकरण तयार करेल, जो वैयक्तिक डेटा गोळा करेल. ज्या व्यक्तीचा हेल्थ आयडी बनवायचा आहे, त्याचे हेल्थ रेकॉर्ड गोळा करण्यासाठी आरोग्य प्राधिकरणाकडून परवानगी दिली जाईल.
असे करा रेकॉर्ड रजिस्टर
या आधारे पुढील काम केले जाईल. सार्वजनिक रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, आरोग्य आणि निरोगीपणा केंद्र किंवा नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी जोडलेले असे आरोग्य सेवा प्रदाता एखाद्या व्यक्तीचा हेल्थ आयडी तयार करू शकतात. तुम्ही https://healthid.ndhm.gov.in/register येथे तुमच्या स्वतःचे रेकॉर्ड रजिस्टर करून तुमचा हेल्थ आयडी देखील तयार करू शकता.