Unlock 1: जीम ८०%, शाळा ७०% अन् सलून ६०%; ‘या’ ३५ ठिकाणी कोरोनाचा किती धोका? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:10 PM2020-06-08T13:10:26+5:302020-06-08T13:11:09+5:30

१ जूनपासून देशात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अनलॉक १ सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.

Unlock 1: Gym 80%, School 70% Unlun 60%; how many danger of corona in 35 places? | Unlock 1: जीम ८०%, शाळा ७०% अन् सलून ६०%; ‘या’ ३५ ठिकाणी कोरोनाचा किती धोका? जाणून घ्या

Unlock 1: जीम ८०%, शाळा ७०% अन् सलून ६०%; ‘या’ ३५ ठिकाणी कोरोनाचा किती धोका? जाणून घ्या

Next

नवी दिल्ली – भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या महामारीने देशात ७ हजारांहून जास्त लोकांचा जीव घेतला आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजाराहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये भारत सहाव्या स्थानावर पोहचला आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.

१ जूनपासून देशात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अनलॉक १ सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. अनलॉक १ सुरु झाल्याने लोक घराबाहेर पडू लागली आहेत. लोकांनी मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे गरजेचे आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांनाच स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, इनडोर आणि आऊटडोर जागांना लक्षात ठेऊन निष्कर्ष काढण्यात आला आहे की, कोणत्या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक धोका असू शकतो. खुल्या वातावरणात व्हायरस पसरण्याची जोखीम कमी असते. ज्या ठिकाणी गर्दी असते त्याठिकाणी जाणे टाळा, कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येण्यापासून वाचा, तज्त्रांनी याबाबत एक यादी तयार केली आहे. यात १०० टक्क्याच्या आधारे नंबर देण्यात आले आहेत, म्हणजे ज्याठिकाणी टक्के जास्त तिथे कोरोनाचा धोका अधिक आहे.

Post Covid-19 Gym Visit: 10 Ways Fitness & Yoga Studios Will Change

  1. बार – ९० टक्के
  2. म्यूजिक कन्सर्टस – ९० टक्के
  3. खेळाचे मैदान – ८० टक्के
  4. जीम – ८० टक्के
  5. एम्यूजमेंट पार्क – ८० टक्के
  6. चर्च  ८० टक्के
  7. बुफे – ८० टक्के
  8. बास्केटबॉल – ७० टक्के
  9. पब्लिक पूल्स – ७०  टक्के
  10. शाळा – ७० टक्के
  11. कॅसिनो – ६० टक्के
  12. रेस्टॉरंट, इनडोर सिटींग – ६० टक्के
  13. खेळाचे मैदान – ६० टक्के
  14. हेअर सलून – ६० टक्के
  15. पंटून बोट राइड्स – ६० टक्के
  16. थिएटर – ६० टक्के
  17. हाऊस डिनर पार्टी – ५० टक्के
  18. एअरलाइन्स – ५० टक्के
  19. मॉल – ५० टक्के
  20. समुद्र किनारे – ५० टक्के
  21. डेंटिस्ट ऑफिस – ५० टक्के
  22. गर्दी – ४० टक्के
  23. ऑफिस – ४० टक्के
  24. डॉक्टर ऑफिस वेटिंग रुम – ४० टक्के
  25. रेस्टॉरंट बाहेर खाणे  - ४० टक्के
  26. खरेदी करणे – ३० टक्के
  27. हॉटेल – ३० टक्के
  28. गोल्फिंग – ३० टक्के
  29. लायब्रेरी आणि म्युझिअम – ३० टक्के
  30. वॉकिंग आणि रनिंग – २० टक्के
  31. तेल भरणे – २० टक्के
  32. हॉटेल, रेस्टॉरंट पॅकिंग खाणे आणणे – १० टक्के
  33. टेनिस खेळणे – १० टक्के
  34. कॅम्पिंग  - ३० टक्के
  35. बॉलिंग – ५० टक्के

Web Title: Unlock 1: Gym 80%, School 70% Unlun 60%; how many danger of corona in 35 places?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.