Unlock 1.0: मॉल-मंदिर किंवा ऑफिसमधून आल्यावर घरात कपड्यांना 'असं' करा सॅनिटाइज...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 04:24 PM2020-06-08T16:24:12+5:302020-06-08T16:26:27+5:30
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळलं जात आहे. पण काही ठिकाणी पालन होत नाहीय.
लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मंदिर, मॉल आणि रेस्टॉरन्ट पुन्हा उघडले गेले आहेत. लोकांवरीलही कुठे येण्या-जाण्याची बंदी काही प्रमाणात हटवण्यात आली आहे. पण कोरोना अजूनही आपल्यात असल्याने आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे.
unlock 1.0 सुरू झाल्यावर लोकांना मॉल, मंदिर आणि हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी मिळाली आहे. लोकांनी बाहेर जाणंही सुरू केलं आहे. दरम्यान कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळलं जात आहे. पण काही ठिकाणी पालन होत नाहीय.
(Image Credit : freepik.com)
कोरोना कसा पसरतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण कपड्यांद्वारे कोरोना पसरतो का? याबाबत कोणताही रिपोर्ट समोर आलेला नाही. पण हे मात्र सांगण्यात आलं आहे की, कपडे हे कीटाणूंचं घर सहज होऊ शकतात. अशात कपडे सॅनिटाइज करण्याचे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
* वेगळ्या बकेटमध्ये ठेवा - बाहेरून घरात आल्यावर कपडे एका वेगळ्या बास्केट किंवा बकेटीत ठेवा. हे कपडे इतर धुतलेल्या कपड्यांमध्ये ठेवू नका. बकेटीत तुम्ही अॅंटीसेप्टीक लिक्विड किंवा हायजीन लिक्विड टाकू शकता. हे कपडे पाण्यात भिजवून ठेवा. याने या कपड्यातील कीटाणून दुसऱ्या कपड्यांवर जाणार नाहीत.
* गरम पाण्याचा वापर - हे कपडे धुण्यासाठी गरम पाणी वापरा. यासाठी पाण्याचं वॉटर टेम्प्रेचर साधारण 55 ते 60 डिग्री ठेवा. याने कपड्यांवरील बॅक्टेरिया नष्ट होईल. अनेक वॉशिंगमशीनमध्ये वॉटर टेम्प्रेचर आधीच सिलेक्ट करण्याचा पर्याय असतो. त्याचा वापर करा.
* केमिकल डिसइफेक्टेंटचा वापर - कपडे धुताना त्यात केमिकल डिसइंफेक्टेंटचा वापर करा. क्लोरीन असलेलं ब्लीड वापराल तर उत्तम. पण हे कपड्यांवर डायरेक्ट टाकण्याऐवजी साबणासोबत मिश्रित करून वापरा. मशीनमध्ये सोप डिसपेंसरमध्ये टाका. जर कपडे बकेटीत धुवत असाल तर आधी पाण्यात टाका.
* मशीन करा डिसइन्फेक्ट - कपडे धुतल्यानंतर मशीन डिसइन्फेक्ट करा. यासाठई एका कापडावर अॅंटीसेप्टीक लिक्विड किंवा केमिकल डिसइन्फेक्टेंटमध्ये भिजवा आणि त्याने मशीन साफ करा. त्यानंतर साध्या पाण्याने मशीन स्वच्छ करा. जर तुम्ही बकेटीचा वापर करत असाल तर ती लिक्विड किंवा पावडरने धुवावी. यासाठी ब्रशचा वापर करावा.
* कपडे चांगले वाळत घाला - कपडे अजिबात भिजलेले राहू देऊ नका. यासाठी मशीन ड्रायरचा वापर करा आणि कमीत कमी 3 मिनिटे स्पीन होऊ द्या. हे कपडे नंतर उन्हात वाळत घाला. कपडे सुकल्यावर ते थेट कपाटात ठेवू नका. ते काही वेळ बाहेरच राहू द्या.
युद्ध जिंकणार! कोरोनासोबत जगताना भारतीयांना विषाणूंपासून वाचवणार 'या' ६ गोष्टी
CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध