हार्ट अटॅक येण्याआधी डोळ्यांमध्ये दिसतात ही लक्षणं, वेळीच ओळखून टाळू शकता धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:23 AM2024-04-05T09:23:13+5:302024-04-05T09:23:39+5:30
Heart attack symptoms :तशी तर हार्ट अटॅकची लक्षणं हृदय आणि छातीसंबंधी असतात. पण काही लक्षण डोळ्यांमध्येही दिसून येतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
Heart attack symptoms : हार्ट अटॅक ही समस्या काही केवळ वयोवृद्ध होणारी समस्या नाही. आता तर कमी वयातही हार्ट अटॅकने अनेकांचे जीव जात आहेत. जगात सगळ्यात जास्त जीव हे हृदयरोगांमुळे जातात. हृदयाच्या मांसपेशींच्या एका भागात रक्त पुरवठा कमी होतो किंवा बंद होतो तेव्हा व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. तशी तर हार्ट अटॅकची लक्षणं हृदय आणि छातीसंबंधी असतात. पण काही लक्षण डोळ्यांमध्येही दिसून येतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
पहिलं लक्षण
तुम्हाला छातीमध्ये वेदना होण्यासोबत जर धुसर दिसत असेल किंवा कमी दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. यात जर तुम्ही उशीर केला तर महागात पडू शकतं.
दूसरं लक्षण
जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो, तेव्हा नसांचं नुकसान झाल्यामुळे डोळ्यातील एक बुबुळ दुसऱ्यापेक्षा मोठं दिसू शकतं. असंही काही जाणवलं तर वेळीच डॉक्टरांकडे जा.
तिसरं लक्षण
त्याशिवाय तुमच्या पापण्यांच्या आजूबाजूला पिवळ्या रंगाच्या पुरळ येतात. असं तेव्हा होतं जेव्हा शरीरात कोलेस्ट्रोल वाढलेलं असतं. अशात कोलेस्ट्रोल कंट्रोल ठेवा. कारण कोलेस्ट्रोल हार्ट अटॅकच्या कारणांपैकी एक आहे.
चौथं लक्षण
तसेच हृदयामध्ये काही समस्या असेल तर तुमच्या पापण्यांचे केस गळणे सुरू होतात. चेहऱ्याच्या एका बाजूला घाम कमी येतो.
पाचवं लक्षण
हार्ट अटॅक येणार असेल तर डोळेही लाल होतात. याचं आणखीही काही कारण असू शकतं. जसे की, कोलेस्ट्रोल वाढणं, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करू नका.